व्यायाम करताय, तर 'या' गोष्टी लक्षात घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

स्वतःचा जीव धोक्‍यात घालून मिळवलेले तात्पुरते स्वास्थ्य खरेच गरजेचे आहे का? आपण वरून कसे दिसतो त्यापेक्षाही आपले आंतरिक स्वास्थ्य जपणे फार महत्त्वाचे आहे.

विशेषकरून बैठी जीवनपद्धती असलेल्या, चाळिशी पार, तसेच स्पेशल पॉप्युलेशनमधील मंडळींनी म्हणजेच दमा, हाडांचे रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, अतिलठ्ठपणा आदी आजार असलेल्यांनी व्यायाम सुरू करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.

व्यायामपूर्व तपासणीद्वारे डॉक्‍टर व फिटनेस मार्गदर्शकांकडून व्यायामाचे स्वरूप, कालावधी आणि वेग समजावून घ्यावे. स्वतःचा जीव धोक्‍यात घालून मिळवलेले तात्पुरते स्वास्थ्य खरेच गरजेचे आहे का? आपण वरून कसे दिसतो त्यापेक्षाही आपले आंतरिक स्वास्थ्य जपणे फार महत्त्वाचे आहे. इंग्रजीत एक छान म्हण आहे, Health is prior to fitness. आरोग्य ही फिटनेस आगोदरची गोष्ट आहे. 

तुमचे वाढलेले वजन अथवा पोट हा निव्वळ तुमच्या बिघडलेल्या आरोग्याचा दुष्परिणाम असून, हा दुष्परिणाम आपल्या शरीरांतर्गत असलेल्या अवयव व ग्रंथीच्या कामातील बिघाडांमुळे निर्माण झालेला असतो. बऱ्याच वेळा आपण जिममध्ये अशी वाक्‍ये ऐकलेली असतील. ‘आम्ही पूर्व खूप व्यायाम केला आहे. आम्हाला काय धोका !’ लक्षात घ्या इतकी वर्षे व्यायामाअभावी आपल्या शरीरांतर्गत अनेक बदल झालेले असतात.

त्यामुळे कधीही शून्यापासूनची सुरवात केलेली कधीही चांगली. आपल्या शरीरामध्ये घडत असलेल्या अनेक जैविक क्रिया, उदा. रक्तदाब, पचनक्रिया, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हार्मोन्सची पातळी आदींचे नियंत्रण व नियम न कोणत्याही औषधाशिवाय आपले शरीर करीत असले तरी आपण शरीराला पुरेसा वेळ देणे तितकेच गरजेचे आहे.
याबरोबरच आपल्याला असलेल्या व्यसनांची माहितीही तज्ज्ञांना द्यायला हवी. डॉक्‍टर आणि वकिलांपासून काहीही लपवून ठेवू नये असे म्हणतात. त्यात आला व्यायाम प्रशिक्षकाचीही भर घालायला हवी.

परदेशाप्रमाणेच आता आपल्याकडे शरीरस्थिती जाणून घेणारी प्रश्‍नावली संकल्पना राबवली जाऊ लागली आहे. त्यात तुमची सर्व वैद्यकीय इतिहास नमूद केलेला असतो. त्या प्रश्‍नावलीतून तुमचे शरीर कमी, मध्यम आणि उच्च यापैकी कोणत्या जोखीम श्रेणीत मोडते हे लक्षात येते. त्यानुसार तुमचा व्यायामाचा कार्यक्रम निश्‍चित होतो. 

शेवटी एकच सांगता येईल की, ससा आणि कासवाच्या शर्यंतीच्या गोष्टीप्रमाणे तुम्हाला कासवाच्या गतीनेच शर्यंत जिंकायची आहे पक्के लक्षात ठेवा.  चांगले आरोग्य म्हणजे नक्की काय? चांगली झोप, चांगले पचन, वेदना व तणावविरहित कोणताही अतिरिक्त लालसा नसलेले चेतनामय जीवनच. मग याकरिता दीर्घकालीन ध्येय्य व वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून तुमची घौडदौड सुरू ठेवा. कारण ‘शरीर सलामत तो कसरत पचास’
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News