या ६ गोष्टी असतील तुमच्यात तर नक्कीच घायाळ होतील पुरुष

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 1 October 2019

पुरुषाला त्याची लाईफ पार्टनर समंजस आणि विचारी असावी असे वाटते. त्यासाठी ते कुठलाही निर्णय घेण्याआधी  मुलींना जाणून घेण्यास जास्त उत्सुक असतात.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना समोरची व्यक्ती किंवा आपला पार्टनर आपल्या बद्दल काय विचार करतात? आपला कोणता स्वभाव समोरच्याला कसा वाटतो?

प्रत्येक पुरुषाला त्याची लाईफ पार्टनर समंजस आणि विचारी असावी असे वाटते. त्यासाठी ते कुठलाही निर्णय घेण्याआधी मुलींना जाणून घेण्यास जास्त उत्सुक असतात. मात्र तुमच्याकडे जर ह्या ६ गोष्टींचा समावेश असेल तर नक्कीच  तुमच्याबद्दल पार्टनरच्या मनात काय आहे ते कळेल. 

(१) प्रत्येक मुलांना त्याची पार्टनर ही समजूतदार असावी असे वाटत असते, स्वविचारी असावी जेणेकरून एखादा निर्णय घेण्याचा प्रसंग घ्यायचा झाला तर ती परिस्थिती हँडल करू शकेल.

(२)नेहमी आनंदी आणि स्वभावाने मनमोकळ्या  असलेल्या मुली प्रत्येक मुलाला आवडतात. 

(३)काही मुलांचं स्वभाव हा मिश्किल असतो त्यामुळे त्यांना त्यांच्या स्वभावासारख्या मुली आवडतात.

४)स्पष्ट बोलणाऱ्या आणि इमानदार मुली ह्या कामामध्ये आणि कुटुंबियांकडे लक्ष देणाऱ्या असल्या तरी आपल्या नात्याला वेळ देणाऱ्या असतील तर अशा मुली देखील मुलांना आवडतात.
 
५)ज्यांमध्ये आत्मविश्वास भरपूर असेल त्या मुली सकारात्मक वृत्तीच्या असतात अशा मुलींना पुरुष नेहमी प्राधान्य देतो. काही मुली केअरिंग नेचरच्या असतात. एवढच नाही तर त्या सिंम्पल स्वभावाच्या असणाऱ्या मुली सुद्धा आवडतात . 

६)महत्वाचे म्हणजे जर मुलींना उत्तम जेवण करता येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची चिंता करायची गरज नाही कारण असे म्हणतात की माणसाच्या मनात उतरायच असेल तर त्याच्या मनाकडे जायचा रास्ता हा पोटातून जातो. अशा महिलांची निवड पुरुष बिंदक्तपणे करतात. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News