UPSC परीक्षेत पास नाही झालीस, तर तुझं आम्ही लग्न करू, वडीलांच्या या धमकीने...

यिनबझ टीम
Saturday, 14 March 2020

ही एक अशा मुलीची कहाणी आहे, जिला तिच्या वडिलांनी सांगितले होते की जर ती यूपीएससी परीक्षेत अपयशी ठरली तर तिचे लग्न लावून देण्यात येईल. मुलीने वडिलांची ही अट मान्य केली आणि नंतर परीक्षेची जोरदार तयारी केली.

या तरुणीचं नावं आहे निधी सिवाच. यूपीएससी 2018 परीक्षा 83 रँकिंगची ही वेळ आहे. घरवाल्यांनी निधीला अभ्यास करण्यासाठी कमी वेळ दिला होता. जर परीक्षेत नापास झाली तर तिचं लवकरात लवकर लग्न करण्यात येईल आणि पास झाली  तर तिला तिच्या करिअरसाठी संधी देण्यात येईल अशी अट तिच्या घरच्यांनी तिच्यासमोर ठेवली होती. या सगळ्या अटींसाठी निधीने होकार दाखवल्यानंतर सुरू झाला तिचा खडतर प्रवास.

यूपीएससी परीक्षेत प्रवेश करण्यापूर्वी  निधी मॅकेनिकल इंजिनियरिंग होती. ती दोन वर्षे टेक महिंद्रामध्ये नोकरी करत होती. त्यातच निधीचा यूपीएससी परिक्षेतील हा तिसरा प्रयत्न होता. याआधीच्या दोन्ही प्रयत्नांमध्ये निधी अपयशी ठरली होती.

दुसर्‍या वेळेस यूपीएससीची तैयारी नोकरी सांभाळत करायची होती. त्यामुळे दुसऱ्यावेळेसही जितका अभ्यास गरजेचा होता, तितका करता नाही आला. त्यामुळे आता तिच्याकडे पर्याय होता, मात्र त्या पर्यायासाठी लागणारा वेळ नव्हता.  

निधीने तिच्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते, की जसं मी युसीएससीच्या तिसऱ्या प्रयत्नाचा निर्णय घेतला, त्यावेळेस लगेचच नोकरी सोडून दिली. नोकरी सोडून देण्याआधी मी माझ्या वडीलांना पुर्णपणे विश्वासात घेतले होते. त्यांनीही मला शेवटीची संधी दिली होती. निधीने सांगितले की माझ्या कुटुंबातील अनेकांनी माझ्यावर लग्नासाठी दबाव आणला. 'मुलगी मोठी झाली, तिने नोकरीदेखील केली, आतातरी तिचं लग्न करावं लागेल' अशा शब्दात  अनेकांनी घरच्यांचे कान भरले होते, मात्र एक संधी मिळवण्यासाठी मी सफल झाली, असे निधीने सांगितले.

परीक्षेच्या तयारीसाठी निधीने स्वत:ला 6 महिने एका खोलीत बंद करून घेतले होते आणि यूपीएससीची तयारी केली होती. त्यानंतर ती प्रिलिम्स परीक्षा पास झाली. त्यावेळेस तिला 80 गुणदेखील मिळाले होते.

प्रिलिम्स क्लिअर केल्यावर लगेचच ती मुख्य परीक्षेच्या तयारीला लागले आणि ती पास झाली. कोचिंग व मार्गदर्शन न घेता परीक्षेची तयारी करणे फारच अवघड होते, परंतू त्याच्या शिवाय केलेला अभ्यासदेखील तितक्याच ताकदीचा होता, त्यामुळे पास होता आलं, असं निधी सांगते. अखेर लग्नासाठी अडून बसलेल्या घरच्यांनीही आपला शब्द मागे घेतला आणि तिला करिअर करण्याची संधी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News