स्माईल असावी तर अशी...

शंभूराज पाटील
Tuesday, 18 June 2019

एक स्माईल कशी असावी,
कृष्णेेसारखी संथ वाहावी.
ओठाआधीच डोळ्यात दिसावी.

एक स्माईल कशी असावी,
कधी खुदकन गालावर पसरत यावी
आणि हळूच खळीत खुलून जावी..
बघताच समोरचा बघतच रहावा.
नकळत स्वतःला विसरून जावावा..

एक स्माईल कशी असावी,
कृष्णेेसारखी संथ वाहावी.
ओठाआधीच डोळ्यात दिसावी.
टिपूस पाण्याने चमकुन जाईल
नजरेने तिच्या घायाळ करील

एक स्माईल कशी असावी
झऱ्यासारखी खळखळ खळावी
डोंगर - दऱ्यातून उनाड पळावी.
चटकन तोंडावर हाताने झाकून घ्यावी
तरीसुध्दा आतून खट्याळ हुंडकत जावी.

एक स्माईल कशी असावी*
शांत झालेल्या वाऱ्यासंगे घिरकी घेत फिरावी
गरम झालेल्या डोक्याला हळूच गार करावी
चंद्रासारख्या चेहऱ्यावर रोज पौर्णिमा दाखवी
भुरळ पाडून समोरच्याला बरोबर कामाला लावी

एक स्माईल कशी असावी
मनातल्या मनात हसतच राहावी
रंगीबेरंगी रंगात सहज रंगून जावी
चुकीचा सहज माफ करून जावी
नात्यांना घट्ट पकडून ठेवून राही..
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News