आई टोपली विणायची तर; सूतारकाम करून तरूण झाला IAS ऑफिसर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 August 2020
  • ज्याला खरंच शिक्षणाची आवड असते. तो परिस्थितीवर मात करत यशस्वी होतोच फक्त त्याला जिद्दीची जोड असावी लागते.
  • अशा एका तरूणांने जिद्दीच्या जोरावर IAS पर्यंतचा पल्ला गाठला आहे.
  • कधी एकेकाळी परिस्थितीमुळे लाकूड कापणे आणि सूतारकाम करावे लागत होते.

नवी दिल्ली :- ज्याला खरंच शिक्षणाची आवड असते. तो परिस्थितीवर मात करत यशस्वी होतोच फक्त त्याला जिद्दीची जोड असावी लागते. अशा एका तरूणांने जिद्दीच्या जोरावर IAS पर्यंतचा पल्ला गाठला आहे. कधी एकेकाळी परिस्थितीमुळे लाकूड कापणे आणि सूतारकाम करावे लागत होते. अभ्यास करून हे काम करणाऱ्या एम शिवागुरू प्रभाकरन यांचा IAS पर्यंतचा संघर्ष कसा होता.

तमिळनाडूमधील तंजावूर जिल्ह्यातील शिवागुरू प्रभाकरन यांच्या कुटुंबाची परिस्थिती खूप वाईट होती. बाप खूप दारू प्यायचा आणि आई-वडिल बांबूने टोपली विणायच्या. त्यातून कसेबसे घर चालायचे. वडिलांच्या व्यसनायापायी असलेला पैसाही जात होता. त्यामुळे लहान वयात घराची जबाबदारी खांद्यावर पडली.

१२ वीनंतर इंजिनियर होण्याचे स्वप्न होते. पण शिक्षण सुटले. त्यानंतर परिस्थितीमुळे त्यांच्याकडे लाकूड कापण्याचे आणि सूतारकाम करण्याची वेळ आली. २ वर्ष मशीने लाकूड कापण्याचे काम त्यांनी केले. मोल मजुरी करून पैसे जमवले आणि त्यातून वेळ मिळेल तसा अभ्यास केला.

गरिबीमुळे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न अजूनही अपूर्ण होते. दिवस रात्र कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी पैसे जमवले आणि त्यासोबत अभ्यासही केला. IIT मधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि UPSC चा अभ्यास सुरू केला. पहिले तीन प्रयत्न अपयशी झाले तरीही हार न मानता चौथ्या प्रयत्नात अखेर २०१७ मध्ये त्यांनी UPSC ची परीक्षा दिली. या परीक्षेत १०१ वा क्रमांक मिळावला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News