आयपीएल रद्द झाले तर 3 हजार कोटींचा तोटा होणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 23 May 2020
  • बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली  यांचे मत

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील ट्‌वेन्टी- 20 विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी हालचाली करणार नाही; परंतु ऑक्‍टोबर- नोव्हेंबरचा कालावधी मिळाला, तर त्या वेळी आयपीएल घेऊ, असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी म्हटले आहे. आयपीएलसाठी बीसीसीआयची सर्व प्रतिष्ठा पणास लागली आहे. यंदाची ही स्पर्धा झाली नाही, तर तीन हजार कोटींचा फटका बसेल, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जाहीर केले आहे.

एकंदरीत कोरोनानंतर क्रिकेट पुन्हा कधी सुरू होईल, याबाबत साशंकता आहे. ऑस्ट्रेलियातील ट्‌वेन्टी- 20 विश्वकरंडक स्पर्धा आयसीसीआयसाठी महत्त्वाची आहे. पुढचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम पाहता आणि परदेशी खेळाडू उपलब्ध होण्यासाठी वर्ल्डकपचाच कालावधी आयपीएलसाठी उपयुक्त आहे म्हणून बीसीसीआयकडून पडद्यामागून हालचाली सुरू करण्यास आल्या आहेत.

टी-20 विश्वकरंडक स्पर्धा 18 ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे; तर धुमल आयपीएलसाठी ऑक्‍टोबर -नोव्हेंबरच्या कालावधीची विचार करत आहेत. पुढील आठवड्यात आयसीसीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत वर्ल्डकपसंदर्भात पुढील निर्णय अपेक्षित आहे. वर्ल्डकप पुढे ढकलावी, अशी सूचना आम्ही का करू, योग्य असेल तो निर्णय आयसीसी घेईल, असे धुमल यांनी सांगितले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News