कंपनी बंद झाली, तर असा काढा पीएफ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020

ही कागदपत्र आवश्यक आहेत

पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड, ईएसआई आइडेंटिटी कार्ड, ड्राइविंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

कंपनी बंद झाली, तर असा काढा पीएफ

मुंबई - लॉकडाउनच्या काळात अनेकांच्या नोक-या सुटल्या, त्यामुळे अनेकांचं अर्थिक चक्र जागीचं असल्याचं चित्र आहे. पण तुमचा कंपनीत जमा झालेला पीएफ तुम्हाला काढता येतोय, कंपनी बंद झाली असली, तर तुमचा जमा झालेला पीएफ तुम्हाला मिळणार आहे.

तुम्ही ज्या कंपनीत काम करीत होता. समजा ती कंपनी बंद झाली आहे, तर किंवा तुम्ही नवीन कंपनीत नोकरीला लागला आहात तिथे पैसे ट्रान्सफर होत नसतील अशा परिस्थीत समजा ३ वर्षे अशी गेली, तर तुमचं PF खातं बंद होतं. तसेच खात बंद झाल्यानंतर त्यातून पैसे काढणे सुध्दा अवघड होऊन जातं. आपलं खातं प्रक्रियेत ठेवण्यासाठी ईपीएफशी संपर्क साधावा लागतो.

समजा तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी काम करताय, ती कंपनी तुमच्या खात्यात पैसे जमा करत नसेल, तर ३ वर्षानंतर तुमचं खातं बंद केलं जात. त्याचबरोबर ईपीएफच्या निष्क्रिय खात्यांशी कनेक्ट केले जाईल. त्यानंतर बॅंकेच्या मदतीने तुम्ही केवायसीमार्फत पैसे काढू शकता.

कंपनी बंद झाल्यानंतर कंपनीचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे -

आपल्या पीएफसाठी ज्यांना दावा करायचा आहे, त्यांनी सर्व कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. बंद झालेल्या खात्यातून  पैसे काढण्यासाठी बँकेची केवायसी, कंपनीची कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे. यामध्ये कागदपत्र पूर्ण नसतील तर पैसे मिळवण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.

ही कागदपत्र आवश्यक आहेत

पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड, ईएसआई आइडेंटिटी कार्ड, ड्राइविंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News