जिल्हा स्तरीय तंत्र प्रदर्शनात आदर्श हायटेक चा बोलबाला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 December 2019

 

शहादा : महाविद्यालयीन तरुणांचा कल मोबाईल वापराकडे जास्त असल्याने विद्यार्थिदशेत घातक परिणाम करणारा आहे. सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्याच्या समतोल साधणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ग्रामीण सेवेतून राष्ट्रसेवा घडवा, असे आवाहन सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे विभागीय सचिव प्रा. संजय जाधव यांनी केले.

 

शहादा : महाविद्यालयीन तरुणांचा कल मोबाईल वापराकडे जास्त असल्याने विद्यार्थिदशेत घातक परिणाम करणारा आहे. सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्याच्या समतोल साधणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ग्रामीण सेवेतून राष्ट्रसेवा घडवा, असे आवाहन सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे विभागीय सचिव प्रा. संजय जाधव यांनी केले.

मनरद (ता. शहादा) येथे शहादा येथील वसंतराव नाईक वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष  हिवाळी शिबिराचे उद्‌घाटनदरम्यान श्री जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव  वर्षा जाधव, संस्थेचे समन्वयक संजय राजपूत, सरपंच जंगा भील, ज्येष्ठ नागरिक हरीभाई पाटील, पोलिसपाटील नीलेश पाटील, विपुल पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक कुलकर्णी, शिक्षिका कविता सिसोदे, सुनीता निकम, महिला बचत गटाच्या अध्यक्षा भावना पाटील, ग्रामपंचायत सदस्य साक्षी पाटील आदी उपस्थित होते.

विशेष म्हणजे या राष्ट्रीय सेवा योजन हिवाळी शिबिराचे उद्‌घाटन प्राथमिक शाळेच्या चौथीतील विद्यार्थी ऋषिराज विपुल पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आले.मान्यवरांचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले.
 प्रा. जाधव म्हणाले, की विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात स्वच्छतेवर भर द्यावा. प्रत्येक विद्यार्थ्याने झाडे लावण्यासाठी प्रयत्न करावेत. शिबिराच्या माध्यमातून चांगले गुण आत्मसात करावे.देशाची सेवा करण्याचे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.

वर्षा जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी  संजय राजपूत,प्राचार्य डॉ. पाटील, नीलेश पाटील, भावना पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. ३० डिसेंबरपर्यंत शिबिर सुरू राहणार असून रोज प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वक्त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. कार्यक्रम अधिकारी प्रा. अजित चव्हाण यांनी  प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. अशोक तायडे यांनी  सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. सुनील पाटील यांनी आभार मानले .

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News