‘आयसीएसई’चा दहावी, बारावीचा निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 July 2020

मेसेजच्या माध्यमातून असा पाहा निकाल
१) मेसेज मध्ये दिल्याप्रमाणे टाइप करा
२) ICSE (स्पेस) युनिक आयडी क्रमांक आणि 09248082883 या क्रमांकावर पाठवा
3) ISC >युनिक आयडी क्रमांक आणि 09248082883 या क्रमांकावर पाठवा

‘आयसीएसई’चा दहावी, बारावीचा निकाल जाहीर

(सीआयएससीई) या मंडळाचा दहावीचा (आयसीएसई) आणि बारावीचा (आयएससी) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. (आयसीएसई) दहावीच्या परीक्षेत ९९ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत, तर  (आयएससी)  बारावीचे ९६.८४ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. www.cisce.org या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही विद्यार्थ्यांचा निकाल पाहू शकता. विशेष म्हणजे सीआयएससीईने यंदाच्या वर्षी मेरिट लिस्ट जाहीर केलेली नाही. काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (सीआयएससीई) या मंडळाने यंदा पत्रकार परीषद घेणार नसल्याचेही जाहीर केले आहे. 

इथे पाहा निकाल –
१) cisce.org किंवा results.cisce.org. ही आहे वेबसाईट 
२) ICSE result 2020 किंवा ISC result 2020 दोन्हीपैकी एकाची निवड करावी लागेल
३) तिथे तुमचा युआयडी क्रमांक, इंडेक्स क्रमांक किंवा इतर विचारण्यात आलेली माहिती भरा
४) क्लिक करा Submit किंवा Show Result
५) यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

मार्चमध्ये यंदा २ लाख ७ हजार ९०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, त्यापैकी  लाख ६ हजार ५२५ विद्यार्थी पास झाले. ५४.१९ टक्के मुलं पास झाले असून ४५.८१ टक्के मुली पास झाल्या आहेत. तसेच ८८ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८५हजार ६११ विद्यार्थी विद्यार्थी पास झाले आहेत. 

मेसेजच्या माध्यमातून असा पाहा निकाल
१) मेसेज मध्ये दिल्याप्रमाणे टाइप करा
२) ICSE (स्पेस) युनिक आयडी क्रमांक आणि 09248082883 या क्रमांकावर पाठवा
3 ISC >युनिक आयडी क्रमांक आणि 09248082883 या क्रमांकावर पाठवा

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना डिजीलॉकरच्या माध्यमातून गुणपत्रिका मिळवता येईल. तसेच विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनासाठी तात्काळ अर्ज करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना मार्कलिस्ट हवे आहे, अशा विद्यार्थ्यांनी डिजीलॉकर अप डाउनलोड करावे. कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News