ICCने केली महिला T20 विश्वची घोषणा; फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 March 2020

महिला टी20 विश्वकप मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या संघाची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने (ICC) शनिवारी जाहीर केली. त्यात एकाच भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला आहे.

महिला टी20 विश्वकप मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या संघाची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने (ICC) शनिवारी जाहीर केली. त्यात एकाच भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला आहे. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतला 85 रनने मात दिली. सलग पाच वेळ विश्वकप जिंकण्याचा मान ऑस्ट्रेलियाने मिळवला आहे.

आयसीसीने उत्तम कामगिरी करणाऱ्या संघात पाच ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंचा समावेश केला. सर्वाधिक रन बनवणारी बेथ मूनी (259) प्रथम तर एलिस हीलीचा (236) द्वितीय क्रमांक मिळवला आहे. 10 गडी बाद करणारी जेस जॉनसन आणि मेगन स्खुट यांना समावेश आहे. मेग लेनिंग हिच्याक़डे कप्तान पदाची जबाबदारी देण्यात आली.

पावसामुळे सेमीफायनल रद्द झाले. त्यामुळे इग्लंडला घरचा रस्ता धरावा लागला. सेमिफायनल पुर्वी इग्लंडने उत्तम कामगिरी केली होती त्यामुळे चार महिला खेळाडूंचा समावेश उत्तम संघात करण्यात आला. फलंदाज नैट स्काइवर, हीथर नाइट तर गोलंदाज सोफी एक्लेस्टो आणि आन्या स्रबशोल यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारताचा एक-एक खेळाडूंचा समावेश करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेची फलंदाज लौरा वूल्ववार्ट, भारताची फिरकी गोलंदाज पूनम यादव यांचा समावेश आहे. 12वी खेळाडू म्हणून शफाली वर्मा हिचा समावेश करण्यात आला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News