आयबीपीएसची पुर्व परीक्षा स्थगीत; जाणून घ्या केव्हा होणार परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 7 September 2020

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्डाने (IBPS) सीआरपी- आरआरबी पदाची ऑनलाईन पुर्व परीक्षा १२ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दोन दिवस आयोजित केली होती, मात्र काही अपरीहार्य कारणामुळे ही परीक्षा स्थगीत करण्यात आली.

मुंबई : क्लास वन आणि क्लास टू साठी घेतली जाणारी आयबीपीएस आरआरबी पुर्व परीक्षा काही कारणामुळे स्थगीत करण्यात आली. लवकर परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जातील अशी माहिती संचालकांनी दिली. सोमवारी (ता. 07) आयबीपीएसने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले, त्याद्वारे माहिती दिली.  

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्डाने (IBPS) सीआरपी- आरआरबी पदाची ऑनलाईन पुर्व परीक्षा १२ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दोन दिवस आयोजित केली होती, मात्र काही अपरीहार्य कारणामुळे ही परीक्षा स्थगीत करण्यात आली. भविष्यात लवकरच सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, उमेदवारांनी आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर याची माहिती दिली जाईल असे आयबीपीएसचे संचालक म्हणाले. आयबीपीएसने गट 'अ' अधिकारी आणि गट 'ब' कार्यालयीन सहाय्याक पदांसाठी 10 ऑगस्ट 2020 रोजी जाहीरात प्रसिद्ध केली होती. पुर्व आणि मुख्य या दोन ऑनलाईन घेतल्या जाणार होत्या. मात्र काही कारणांमुळे या परीक्षा स्थगीत करण्यात आल्या.  

संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News