IAS मुलाखतीत प्रश्न : पहिली सिगारेट कधी ओढली होतीस? उत्तर असं दिलं की...

यिनबझ टीम
Thursday, 23 January 2020

देशात सर्वश्रेष्ठ मानली जाणारी स्पर्धा परिक्षा म्हणजे यूनियन पब्लिक सर्विस कमीशन (UPSC) मार्फत घेतली जाणारी परिक्षा होय. ही परिक्षा मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या  कठिण प्रश्नांमुळे ओळखली जाते, त्याचबरोबर ती अनोळख्या प्रश्नांमुळेदेखील ओळखली जाते.

दिल्ली - देशात सर्वश्रेष्ठ मानली जाणारी स्पर्धा परिक्षा म्हणजे यूनियन पब्लिक सर्विस कमीशन (UPSC) मार्फत घेतली जाणारी परिक्षा होय. ही परिक्षा मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या  कठिण प्रश्नांमुळे ओळखली जाते, त्याचबरोबर ती अनोळख्या प्रश्नांमुळेदेखील ओळखली जाते. 

2017 च्या 568 रँकवर असलेल्या विकास मीणाला देखील असाच एक अजब सवाल विचारण्यात आला होता. विकासला विचारण्यात आले होते की तुम्हाला दहावी आणि बारावीमध्ये खूप चांगले गुण मिळाले होते,  तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही तुमचं लहानपण जगला नाही? त्यावर उत्तर देताना विकास म्हणाला की नाही, उलट मला त्यातून खूप काही शिकायला मिळालं. त्यानंतर विकासला असे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते, ज्या प्रश्नांची त्याला कोणतीच कल्पना नव्हती. त्यातच त्याला अजून एका प्रश्नाला सामोरे जावे लागले होते. 

तुम्ही तुमच्या आयुष्यातील पहिली सिगारेट कधी ओढली होती, हा प्रश्न अधिकाऱ्यांनी विचारल्यानंतर विकास मात्र अवाक झाला. त्यावर उत्तर देताना विकासने सिगारेटपासून होणाऱ्या नुकसानाबद्दल सांगितले आणि सोबतच "सर मी अजून एकदाही सिगारेट ओढली नाही" अशा शब्दात उत्तर दिलं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News