चाहुल तुझ्या भेटीची 

साक्षी केसकर
Thursday, 12 September 2019

चंद्रकलातही तुझे रुप
मज नित्याचेच वाटे,

किती सावरु अन् किती आवरु 
                ह्या वेड्या मना सांग रे,                

प्रितीत तुझ्या साधे क्षण ही भासे मज 
अनोखे आनंद  सोहळे,
   
चंद्रकलातही तुझे रुप
मज नित्याचेच वाटे,

ही चाहुल तुझ्या साथीची 
की माझ्या वेड्या आशेची रे,

कल्पनांतल्या ह्या सोबतीची 
कशी सांधू गाठ सत्यात रे,           

धडधडणारे हदय माझे
गाणे गाती तुझेच रे,

श्वेतआयुष्याच्या भूमीवरचे
रंगीबेरंगी फूल हे, 

प्रितसाथीने तुझ्या फुलेल का
रोज  रोज रे, 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News