कस सांगू आई तुला

अमरदीप शेंडे, यवतमाळ
Sunday, 14 July 2019

आई
तुझ्याबद्दल आई 
काय लिहू पेनाने,
शब्द मला भेटत नाही
लिहत जातो मनाने....

तुझ्याबद्दल आई एनेकांनी
रचल्या अनेक रचना,
शब्दात तुला सामावू शकू
एवढा मी नाही शहाणा...

काव्यात आई कुणाच्या
सामावू तू शकत नाही,
तुझ्याऐवढी माया मला
जगात कुठे दिसत नाही....

गर्भात आई तुझ्या 
9 महिने ठेवले मला,
माझ्यासाठी किती यातना
सोसाव्या लागल्या तुला....

आई
तुझ्याबद्दल आई 
काय लिहू पेनाने,
शब्द मला भेटत नाही
लिहत जातो मनाने....

तुझ्याबद्दल आई एनेकांनी
रचल्या अनेक रचना,
शब्दात तुला सामावू शकू
एवढा मी नाही शहाणा...

काव्यात आई कुणाच्या
सामावू तू शकत नाही,
तुझ्याऐवढी माया मला
जगात कुठे दिसत नाही....

गर्भात आई तुझ्या 
9 महिने ठेवले मला,
माझ्यासाठी किती यातना
सोसाव्या लागल्या तुला....

माझ्या जन्मवेळी आई
नक्कीच तू रडली असणार,
तुझे ते आनंदाश्रू
कुणालाच कळले नसणार....

जन्मताच आई
मला तू जवळ घेतलेस,
किती प्रेमाने डोक्यावरून
हात आई फिरवलेस....

जवळ घेऊन आई तू
दूध मला पाजले,
माझ्याचसाठी आई तू
किती ग हाल भोगले....

बालपणी आई माझे
तू सर्व लाड पुरविले,
बालपणीचे दिवस आई
स्मरणात माझ्या राहिले....

माझ्या थोड्या वेदनेने
आई तू दुःखी व्हायची,
मी निझलो पाहिजे म्हणून
सारी रात्र जगायची....

मी निझलो शांत की
आनंद तुला व्हायचा,
माझ्या थोड्या आवाजाने
जाग तुला यायचा....

अश्या कित्येक रात्री
माझ्यासाठी आई जागली,
माझीच चिंता कायम
तिला होती लागली....

हाडाचे पाणी करून
आईने मला शिकविले,
त्या बदल्यात मी आईला
काहीच तर नाही दिले....

परिस्थितीने जरी गरीब असली
तरी मनाने ती नेक आहे,
अशी माझी आई
जगात एक आहे...

ममतेपुढे आई तुझ्या
नतमस्तक व्हावे वाटत,
पुन्हा-पुन्हा तुझ्याचपोटी
जन्म आई घ्यावा वाटत....

स्वार्थाने हे जग
इतक आई झपाटल,
तुझ्याशिवाय विश्वासाच 
कुणीच नाही भेटल....

म्हणतात येथील प्रेमवेडे
पहिलं प्रेम,
विसरता काही येत नाही
विसरता कस येणार
पहिल प्रेम आईशिवाय
कुणावरही होत नाही.....

कस सांगू आई तुला
माझ्यासाठी तू काय आहे,
जगण्याची आस तू
तूच माझा श्वास आहे...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News