मला राजकारणात अजिबात रस नाही, पण गाण्यातून लोकसेवा करीन अमृता फडणवीस 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Saturday, 7 March 2020

मागील काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत, त्यातचं त्यांनी काल महिला दिनाच्या निमित्ताने एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांर गप्पा मारल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राजकारण याविषयावर त्यांनी त्यांची मते मांडली. यावेळी त्यांनी गाण्याच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 

फडणवीस यांना गायिका आहात, गृहिणी विविध पदांवरती तु्म्ही कार्यरत आहात, विशेष म्हणजे तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या पत्नी आहात ? तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का ? असा प्रश्न तेथील खाजगी वाहिनीत विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर देताना म्हणटले की, मला राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही, तसेच माझ्या मनात जे येते ते पटकन बोलून टाकते, माझ्या मनात मी काहीच ठेवत नाही. सोशल मीडियावरती तर मला मी महाराणी असल्यासारखं वाटतं. कारण माझ्य़ावरती चारही बाजूनी हल्ला केला जातो आणि तिथेचं तटस्थ मी उभी आहे. मला माझ्या गाण्यातून लोकसेवा करायला आवडेल असं त्या म्हणाल्या.. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News