मी आदित्य ठाकरेंना ओळखत नाही - रिया चक्रवर्ती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 August 2020

मी आदित्य ठाकरेंना ओळखत नाही - रिया चक्रवर्ती

मी आदित्य ठाकरेंना ओळखत नाही - रिया चक्रवर्ती

महाराष्ट्र - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकऱण अनेक बाजूनी चर्चिले जात आहे. आत्महत्येप्रकऱणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नुकतेच रियाने आपल्या वकील्यांच्या मार्फेत आपलं म्हणणं मांडलं आहे. पोलिसांच्या आणि ईडीच्या तपासात काहीही मिळालेलं नाही. त्यामुळे सुशांतच्या घरच्यांनी केलेले आरोप पुर्णपणे खोटे आहेत. ते बोलत असलेल्या गोष्टींमध्ये तथ्य नसून ते काहीही बोलत आहेत असं रियाचं म्हणणं आहे.

सुशांतच्या प्रकऱणाचं राजकारण होताना दिसतंय असंही रियाच्या वकीलांचं म्हणणं आहे. रिया आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण रिया आणि आदित्य ठाकरे कधी भेटलेले नाहीत. त्याचबरोबर आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते असल्याचे सुध्दा माहित नाहीत असं रियाच्या वकीलांनी सांगितलं.

रिया चक्रवर्तीचं स्टेटमेंट

आदित्य ठाकरेंना कधीचं भेटलेले नाही. त्यामुळे ओळखत सुध्दा नाही.
सुशांतचं कुटुंब हे उच्च शिक्षित आहे. तसेच त्यांच्याघरी ओपी सिंह हे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडून करण्यात आलेले आरोप निरर्थक आहेत.
बिहार पोलिसांचं एफआयआर पूर्णपणे राजकीयदृष्टीने तयार करण्यात आलं आहे.
सुशांतचे आणि माझे संबंध पहिल्यापासूनचं चांगले नव्हते.
पैसे हडपल्याचा केलेल्या आरोपात अजिबात तथ्य नाही, कारण ई़डीला आणि पोलिसांनी केलेल्या चौकशी काहीच तथ्य आढळलेले नाही.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News