तुझ्या डोळ्यातलं पाणी अजुन मला दिसतय ना गं आई...

सागर मालती संजय बारटक्के, सातारा
Sunday, 12 May 2019

उमलनार्या त्या फुलान स्वखुशिन काटयाना का स्वीकारल
अनंत वेदना भोगुन तु बाईच आईपण का अंगीकारल
घराण्याची वंशवेल वाढवुन सुखसमृद्धिचि बनलिस तु जाई...
तुझ्या डोळ्यातल पाणी अजुन मला दिसतय ना ग आई ...।।१।।

तोडकिमोडकी चुल मूल संभाळत खाल्यास तु सासुच्या शिव्या
पतीराजांचा मार हसत सहन करत गायल्यास तु आईंच्या ओव्या
पतीचि साथ सुटली तरी खमकी बनुन राहिलीस तु मुलाबाळपायी...
 तुझ्या डोळ्यातल पाणी ...।।२।।

उमलनार्या त्या फुलान स्वखुशिन काटयाना का स्वीकारल
अनंत वेदना भोगुन तु बाईच आईपण का अंगीकारल
घराण्याची वंशवेल वाढवुन सुखसमृद्धिचि बनलिस तु जाई...
तुझ्या डोळ्यातल पाणी अजुन मला दिसतय ना ग आई ...।।१।।

तोडकिमोडकी चुल मूल संभाळत खाल्यास तु सासुच्या शिव्या
पतीराजांचा मार हसत सहन करत गायल्यास तु आईंच्या ओव्या
पतीचि साथ सुटली तरी खमकी बनुन राहिलीस तु मुलाबाळपायी...
 तुझ्या डोळ्यातल पाणी ...।।२।।

सारे एकटे सोडुन गेले तेव्हा हे घर तुला खायला उठल होत
घट्ट कुशित घेऊन आम्हाला दुःख तु डोळ्यांत मिटवुन ठेवल होत
बोल्लीस तु तेव्हा अखंड कष्टाच्या यद्न्याशिवाय माझी काय धड़गत नाही ...
 तुझ्या डोळ्यातल पाणी ...।।३।।

निसटलेल ते संसारतल चाक दहकत्या आगीतुन पावले टाकित होत 
हात रिते असतानाही लेकिंच्या अक्षदांसाठी जिद्दीन धजावत होत
पदरी पैसा नसतानाही बाळतपणे करून लेकिंची बनलिस तु दाई ...
 तुझ्या डोळ्यातल पाणी ...।।४।।

फाटक्या पदराने पोट बाँधून आमच पोट मात्र गच्च भरवलस
चिमटा काढून पोटाला व्याही- विहीणीच नातगोत तु संभाळलस
सार्या सुखाची नाव पाण्यात सोडुन नातवंड़ासाठी गातेस तु अंगाई ...
 तुझ्या डोळ्यातल पाणी ...।। ५।।

संस्कारांचि शिदोरी देऊन डोळ्यांत अंजन घालून आम्हाला जपल होत 
दयनीय अवस्था आपली पाहण्यासाठी सार जग हपापल होत
जिवघेन्या संकटाना तोंड देत एवढ्याच एवढ़ कस वाढ़वलस तु बाई ...
 तुझ्या डोळ्यातल पाणी ... ।।६।।

लेकिंचे संसार सावरीत सावरीत पोराला तु शिक्षणाला पाठवलस
चहा- पोहयांच्या जेवनावर ढेकरांनी तु पोट भरवलस
तुझ्या मायेच कौतुक कराव जशी वासराची गं गाई ...
 तुझ्या डोळ्यातल पाणी ...।।७।।

मलापण वाटत शिकुन सवरुन तुझ स्वप्न पुर करायच 
बहीनींसमवेत आपल्याही दारात आनंदाने सुखाच रोपट लावायच
सोन्या- मोत्यांनी तु नटुन हसावीस तेव्हा होई माझ्या जन्माची पुण्याई ...
 तुझ्या डोळ्यातल पाणी ...।।८।।

दु:खाच ओझ उतरवुन तुला अगदी आनंदी निवांत ठेवायच 
रित्या पोटाला आतातरी आपण पंचपक्वानांनी भरवायच 
तुझ्या कष्टाची याद जरि आली की होते जिवाची लाहीलाही...
 तुझ्या डोळ्यातल पाणी ...।।९।।

आता एकच मागणे देवाला पुढ़लाही जन्म तुझ्याच पोटी घ्यावा
सारी सुखे  तुला  देउन हा देह तुझ्याच पायाशी निजवावा
आपला आनंद आपण जिद्दीने गं मिळवू अशी माझी प्रेमळ तु माऊली...
हे आगळ रडु पूरे झाले आता ... 
हस ना ग माझे आई ...। गोड हस ना ग माझे आई ...।।१०।।
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News