मी मतदार झालोय

प्रतिक कांबळे, मुंबई
Wednesday, 24 April 2019

मी हिरव्यागार झाडांना मत देतो
मी त्या झाडांना आलेल्या फुल-फळांना मत देतो
मी माझ्या काळ्या आईलाही मत देतो

मी मतदार झालोय
कोणत्याही पक्षाचा नाही का कोणत्या जातीचा
तुझ्या माझ्या दिड दंबडी च्या जिंदगीचा
 रोजच मतदान करतोय मी त्या भुकेल्या पोटाला

रोजच मतदान करतोय मी त्या कोरड पडलेल्या घश्याला
रोजच मतदान करतोय मी त्या डोळ्यातून येणाऱ्या आसवांना
मी माझा मतदानाचा अधिकार पुर्णपणे बजावतोय
कशी का होईना मी माझी घराणेशाही चालवतोय

होय मी माझ मत विकतोय.......
दररोज दरदिवशी काबाडकष्ट करून शेपाचशे रूपये घेऊन
मी माझ्या कोरड पडलेल्या घश्याला
भुकेल्या मोकळ्या पोटाला

डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांना
मनात येणाऱ्या एकाएका विचारांना
मी रोजच न चुकता मतदान करतोय
होय मी माझ्या घराणेशाहीच मत विकतोय

अन् पुन्हा मतांचा बाजार करायला
हुकुमशाहीच्या बाजारात जातोय
मी उगवत्या सुर्याला मत देतो
मी वाहणाऱ्या पाण्याला मत देतो

मी हिरव्यागार झाडांना मत देतो
मी त्या झाडांना आलेल्या फुल-फळांना मत देतो
मी माझ्या काळ्या आईलाही मत देतो
अन् घराणेशाही चालवण्यासाठी स्वतःचा विकास

मी माझा स्वतःच करून घेतो
मी माझे मत माझ्या घराणेशाहीला विकून आलोय
दररोज नित्यनियमाने मतदान करून मी मतदार झालोय

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News