कोरोनावरील लसीच्या संशोधनासाठी मी स्वतःचे प्राणपणाला लावण्यास तयार आहे! : सोफी रोझ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 August 2020
  • कोरोना वायरसच्या फैलावामुळे संपूर्ण जग सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. आतापर्यंत जगातील करोडो लोकांना या कोरोनाने ग्रासल असून लाखो लोकांचा यामध्ये मृत्यू देखील झाला आहे.
  • कोरोना हे मानवजातीवर आलेल मोठं संकट असून यातून बाहेर पडायचे असल्यास कोरोनावर औषध आणि लस निघणं फार महत्वाचं बनल आहे.

कोरोना वायरसच्या फैलावामुळे संपूर्ण जग सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. आतापर्यंत जगातील करोडो लोकांना या कोरोनाने ग्रासल असून लाखो लोकांचा यामध्ये मृत्यू देखील झाला आहे. कोरोना हे मानवजातीवर आलेल मोठं संकट असून यातून बाहेर पडायचे असल्यास कोरोनावर औषध आणि लस निघणं फार महत्वाचं बनल आहे. सध्या कोविड १९ वर कोणतेही औषध नसल्याने इतर आजारांत वापरल्या जाणाऱ्या औषधांचा वापर सध्या कोरोना रुग्णांवर केला जात आहे. कोरोना विषाणूचा संपूर्णपणे नायनाट करायचा असल्यास कोरोनावर लस शोधणं अत्यंत गरजेचं बनलं आहे.

कोरोना सारख्या आजारावर लस शोधण्याकरीता जगातील विविध देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. कोरोना लसीच्या संशोधनाकरीता या लसीची मानवी चाचणी होणे फार गरजेचे आहे. तेव्हाच तयार केलेली कोरोनावरील लस ही माणसाच्या शरीराला कोरोना विषाणूपासून वाचवण्यात खरोकर उपयोगी आहे कि नाही हे कळेल. कोरोनाच्या मानवी चाचणीकरीता मी स्वतःचे प्राणही पणाला लावेन असे विधान एका संशोधक तरुणीने केले आहे. या संशोधक तरुणीचे नाव सोफी रोझ असून ती केवळ २२ वर्षांची आहे. सोफी ही काही महिन्यांपूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठात क्लिनिकल कॅन्सर रिसर्चर म्हणून काम करीत होती. मे महिन्याच्या सुरुवातीला तिने ऑक्सफर्ड विद्यापीठातील काम सोडून १DaySooner ही मोहीम सुरु केली. ह्या मोहिमेतून ती तरुणांना कोरोनाच्या उपचाराकरीता तयार होणाऱ्या लसीच्या मानवी चाचणीसाठी प्रभावित करण्याचे कार्य करीत होती. तसेच तिने विविध देशांना कोरोनावरील लस लवकरात लवकर यावी यासाठी ह्यूमन चॅलेंज ट्रायल सुरु करण्याचे आवाहन केले. 

कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीकरीता येणाऱ्या स्वयंसेवकांना जाणूनबुजून कोरोना बाधित व्हावे लागते आणि त्यानंतर शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या लसीचा प्रयोग संबंधित व्यक्तीवर केला जातो. यादरम्यान त्याव्यक्तीला लस टोचल्यावर त्याच्या शरीरातील कोविड विषाणूचा नायनाट होतो कि नाही तसेच त्याव्यक्तीच्या शरीरात लस दिल्यानंतर कोणते बदल होतात यासाऱ्याचे निरीक्षण केले जाते. काही वेळा मानवी चाचणीकरीता आलेल्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची देखील यामध्ये शक्यता असते. परंतु सोफीच्या म्हणण्यानुसार जर माझ्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचणार असतील तर मला आणि माझ्या सारख्या अनेक तरुणांना ह्या मानवी चाचणीसाठी पुढाकार घ्यायला हवा असे ती म्हणते. सोफी रोझ या २२ वर्षीय तरुणीने कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीत सहभाग घेणाऱ्यांकरीता १DaySooner ही मोहीम सुरु केली होती. या मोहिमेत आतापर्यंत १५१ देशातील ३३ हजार स्वयंसेवकांनी मानवी चाचणीत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News