मी खेळरत्नास पात्र नाही.. पहा कोण म्हणाले असे..

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 19 July 2020

खेलरत्न पुरस्कारासाठी हरभजन सिंगच्या नावाची शिफारस मागे घेण्याचा निर्णय झाल्यामुळे पंजाबमध्ये वाद निर्माण झाला;

 चंडीगड:  खेलरत्न पुरस्कारासाठी हरभजन सिंगच्या नावाची शिफारस मागे घेण्याचा निर्णय झाल्यामुळे पंजाबमध्ये वाद निर्माण झाला; मात्र खेलरत्नसाठी गेल्या तीन वर्षांतील कामगिरी पाहिली जाते आणि आपण 2016 नंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळलो नसल्याचे सांगत हरभजननेच आपण शिफारस मागे घेण्यास सांगितले असल्याचा खुलासा केला.

पंजाब सरकारने खेलरत्नसाठी हरभजन सिंगच्या नावाची शिफारस केली होती, पण ती आता मागे घेतली आहे. त्यावरून खूपच चर्चा सुरू आहे. खरे सांगायचे झाले तर या पुरस्काराचे निकष मी पूर्ण करत नाही. पुरस्कारासाठी गेल्या तीन वर्षांतील कामगिरी लक्षात घेतली जाते, असे ट्‌विट हरभजनने केले आहे. 40 वर्षीय हरभजन त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला आहे.

माझ्या पुरस्काराची शिफारस मागे घेण्याचा पंजाब सरकारचा निर्णय योग्य आहे. कृपया माध्यमांनी यावरून तर्क-वितर्क करू नयेत, असेही हरभजनने सांगितले. त्याच वेळी त्याने गतवर्षी आपल्या नावाची शिफारस पंजाब सरकारने केली होती, पण तो निर्णय उशिरा झाला होता आणि अर्ज उशिरा पोहोचला होता. यंदाच्या बाबतीत बोलायचे तर पुरस्काराचा तीन वर्षांचा निकष मी पूर्ण करत नाही, असेही त्याने सांगितले.

माजी आंतरराष्ट्रीय फिरकी गोलंदाज हरभजनने एकंदर तीन ट्‌विट करत आपली भूमिका मांडली आहे. त्याने 103 कसोटीत 417; तर 236 एकदिवसीय लढतीत 269 फलंदाज बाद केले होते. त्याने नुकतेच अजूनही आपण जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजास थेट आव्हान देऊ शकतो असे सांगितले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News