अहंकारी लोकांना दिल्लीकरांनी नाकारल्याचा आनंद - रोहित पवार 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Tuesday, 11 February 2020
  • दिल्ली विधानसभा निवडणूक हि आम आदमी पक्षाने स्वबळावार जिंकल्याने रोहित पवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
  • तसेच या विजयाच्या  नांदीची सुरुवात आणि भारतीय जनता पक्षाच्या   पराभवाचा श्रीगणेशा हा महाराष्ट्रातून झाल्याचा सार्थ अभिमान आहे असे मतदेखील रोहित पवार यांनी मांडले. 

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या दणदणीत यशामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावर  देशभरातील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त अहंकारी लोकांना काबीज करता आले नाही अशा आशयाचे मत शरद पवारांचे नातू तसेच कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक हि आम आदमी पक्षाने स्वबळावार जिंकल्याने रोहित पवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच या विजयाच्या  नांदीची सुरुवात आणि भारतीय जनता पक्षाच्या   पराभवाचा श्रीगणेशा हा महाराष्ट्रातून झाल्याचा सार्थ अभिमान आहे असे मतदेखील रोहित पवार यांनी मांडले. 

दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव करण्यासाठी तसेच दिल्ली काबीज करण्यासाठी देशभरातील  भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची फौज हि दिल्लीत तळ ठोकून होती. भाजपचे थोडेथोडके नाही तर तब्ब्ल १२ मुख्यमंत्री प्रचारासाठी ठाण मांडून बसले होते

मात्र  त्याचा शून्य उपयोग झाल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. महाराट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची फौज तर दिल्ली जिंकण्याचे स्वप्न पाहत होती मात्र त्यांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला अशा अशा आशयाचे मत देखील रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडले.

बऱ्याच दिवसांपासून राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र अशी घोषणा ऐकायला मिळाली नाही त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या अस्ताची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली आहे त्यामुळे आम्ही सर्व समाधानी आहोत असेही  ते म्हणाले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News