मी कॅमेरासमोर यायलाही लाजत होते : दिशा पटानी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 January 2020
  • एका मुलाखतीदरम्यान दिशाने तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले.
  • ती म्हणाली, मी एवढी लाजाळू होते की, अभिनेत्री होईल असा विचारही मी केला नव्हता.

सर्वांत मोठा चाहता वर्ग असलेली बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'धोनी', 'बागी' हे चित्रपट खूप गाजले. नुकताच तिचा आगामी चित्रपट 'मलंग' हा चित्रपट येत आहे. त्यामध्ये ती आदित्य कपूर सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

या चित्रपटात हॉट लूकमध्ये असल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांनी हॉट फोटोशूट देखील केलं आहे. याबाबत बोलताना दिशाने सांगितले की, सुरुवातीला मी खूप लाजाळू होते, फोटो काढण्याची देखील मला लाज वाटायची.  

एका मुलाखतीदरम्यान दिशाने तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले. ती म्हणाली, मी एवढी लाजाळू होते की, अभिनेत्री होईल असा विचारही मी केला नव्हता. कॅमेरासमोर येताना मी खूप लाजत होते. मी स्वतःहुन फोटो काढायला देखील पटकन तयार होत नव्हती. मात्र आता बॉलिवूडमध्ये येऊन मी माझ्यात प्रगती केली आहे, आणि वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 

दिशाचा आगामी चित्रपट 'मलंग' हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये दिशा पटानी अतिशय हॉट लूकमध्ये दिसत आहे. तसेच 'राधे' या चित्रपटातून  सलमान खानसोबत ती प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. एकेकाळी कॅमेरासमोर लाजणारी ही अभिनेत्री आज मोठ्या प्रमाणात तरुण वर्गात फेमस झाली आहे. 

दिशा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती सातत्याने आपले अपडेट सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग प्रचंड आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News