हैद्राबादी व्हेज बिर्याणी...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 August 2020
  • सर्वाजण हॉटेल मधील चमचमीत जेवणाला मिस करत आहेत.
  • कारण लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहेत.
  • पण तुमच्यासाठी मी हॉटेलसारखीच हैद्राबादी व्हेज बिर्याणीची रेसिपी घेऊन आली आहे.

सर्वाजण हॉटेल मधील चमचमीत जेवणाला मिस करत आहेत. कारण लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहेत. पण तुमच्यासाठी मी हॉटेलसारखीच हैद्राबादी व्हेज बिर्याणीची रेसिपी घेऊन आली आहे.

साहित्य :-

  • २ वाट्या बासमती तांदुळ
  • २ कांदे
  • १ चमचा किसलेले आलं
  • १ चमचा किसलेला लसूण
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १/२ वाटी चिरलेला पुदिना
  • पनीर
  • पाव वाटी फ्लॉवर
  • स्वीट कॉर्न
  • मटार
  • गाजर
  • ३ चमचे हळद
  • २ चमचे तिखट
  • जीरे
  • ४-५ लवंगा
  • २-३ तमालपत्र
  • ३-४ वेलदोडे
  • ५-६ दालचिनी तुकडे
  • ३-४ चमचे दही
  • २-३ चमचे तूप
  • केशर
  • २ चमचे लिंबाचा रस
  • मीठ

 

कृती :-

तांदूळ ३० मिनीटे आधी धूवून ठेवा. कांदा उभा चिरुन तळुन ठेवा. सोनेरी कुरकुरीत होईपर्यन्त तळा. फ्लॉवर आणि पनीरचे थोडे जाड तुकडे करुन त्यात मटार, स्वीट कोर्न आणि गाजराचे बारीक तुकडे घालुन एकत्र करा. त्यात आले, लसुण पेस्ट, हळद, तिखट, मीठ, वेलदोडे (अख्खे), दालचिनी तुकडे घाला. त्यातच लिंबाचा रस, बारीक चिरलेली हिरवी मिर्ची, कोथिंबिर, पुदिना, तळलेला कांदा आणि दही घालुन सर्व जिन्नस नीट ए़़कत्र करुन ३० मिनीटे मॅरिनेट करा.

एका भांड्यात तांद्ळाच्या दुप्पट पाणी घेऊन त्यात जीर, लवंग तमालपत्र घालुन तांदुळ शिजवत ठेवा. तांदुळ पुर्ण शिजवुन न घेता किंचीत कच्चे असतानाच त्यातले पाणी काढुन वेगळे ठेवा. (भातातून लवंग आणि तमालपत्र पण वेगळे काढा.)

मोठ्या नॉन स्टीक पॅन मधे मॅरिनेट केलेले मिश्रण पसरवा. त्यावर सगळा भात घालून वरुन २ चमचे तूप घाला. दुधात केशर मिक्स करुन ते भातावर घाला. पॅनवर घट्ट झाकण बसवा आणि १० मिनिटे शिजवत ठेवा. कांदा-कोथिंबीर रायता करुन गरमा गरम बिर्याणी बरोबर खायला घ्या.

टिप :-

  • पुदिन्यामुळे बिर्याणीला खूप छान स्वाद येतो, नक्की घाला.
  •  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News