पत्नीसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल; पोलिसांनी दिला दणका 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 January 2020
  • या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पती आपल्या पत्नीचे केस विंचरताना दिसत आहे, त्यासोबतच अश्लील चाळे करताना दिसत आहे.
  • तसेच पत्नीने देखील पॉर्न संदर्भात  संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

कुवेत : व्हायरल व्हिडीओमुळे एका जोडप्याला चांगलीच अद्दल घडली आहे. मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे पती-पत्नी अडचणीत आले आहेत. पोलिसांनी या जोडप्याला अटक केली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. 

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पती आपल्या पत्नीचे केस विंचरताना दिसत आहे, त्यासोबतच अश्लील चाळे करताना दिसत आहे. तसेच पत्नीने देखील पॉर्न संदर्भात  संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. डेली मेलच्या माहितीनुसार, या व्हिडीओमध्ये दिसणारा नवरा हा अल्पसंख्यांक (बिदून) समाजाशी संबंधित असून तो या देशाचा म्हणजेच कुवेतच्या नागरिकत्वात बसत नाही. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे. 

कुवेतमध्ये कडक कायदे पाळले जातात. देशाच्या शिष्टाचाराविरोधात वागल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. कुवेतमधील कायदे अतिशय कडक असून त्याचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे, जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्याविरोधात अशापद्धतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तसेच कुवेतमध्ये बिदून समुदायातील अनेक लोक वास्तव्यास आहेत. मात्र तेथील सरकारने या नागरिकांना नागरिकत्व देण्यास नाकारले आहे. त्यामुळे येथील लोकं कोणत्याच देशाचे नाहीत, असं पोलिसांनी स्पष्ट केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News