कोरोना झालेल्या पत्नीला घरात घेण्यास पतीचा नकार, मग...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 July 2020

कोरोनाची लोकांनी इतकी भीती वाटतं आहे, की ते घरच्या लोकांनाही एका वेगळ्या नजरेने बघायला लागले आहेत. कोरोनाच्या भीतीने जे घाबरले आहेत, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे.

कोरोना झालेल्या पत्नीला घरात घेण्यास पतीचा नकार, मग...

नागपूर - कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आहे की, नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेकांचे नातेसंबंध संपुष्टात आले आहेत. तसेच पती-पत्नींचं वाद सुध्दा चव्हाट्यावर आले आहेत, अशी प्रकरण वारंवार उजेडात येत असल्याने पोलिस आणि इतर संस्था समुपदेशन करत अशी प्रकरण सोडवण्याचं काम करत आहेत. 


 

नागपूरमध्ये अशी एक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला कोरोना झाला म्हणून पतीने पत्नीला घरात घेण्यास नकार दिला आहे. त्यानंतर हे प्रकरण महिला आयोगात गेलं. तिथून या प्रकरणाला वाचा फोडण्यात आली. आतापर्यंत महिला आयोगाकडे असे अनेक प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहेत. कोरोनाच्या काळात वाळित सुध्दा अधिक प्रकरण आल्याचे महिला आयोगाने स्पष्ट करण्यात आले आहे. 

"तूला कोरोना झालाय, तू माझ्याजवळ येऊ नको, तू माझ्या जवळ आलीस तर मलाही कोरोना होईल, आणि घरातही येऊ नको" असं पतीने पत्नीला सांगितले. त्यानंतर ही तक्रार महिला आयोगाकडे गेली, नंतर पतीचं समुपदेशन सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोनामुळे अधिक लोकांच्या नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. तसेच पुर्वी एचआयव्हीची लागण झालेल्या रूग्णांच्या घरच्यांकडेही संशयित नजरेने पाहिले जात होते. असं निरीक्षण समुपदेशन टीमने नोंदवलं आहे. 

कोरोनाची लोकांनी इतकी भीती वाटतं आहे, की ते घरच्या लोकांनाही एका वेगळ्या नजरेने बघायला लागले आहेत. कोरोनाच्या भीतीने जे घाबरले आहेत, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. लॉकडाउनमध्ये प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी झाली आहे. त्याचबरोबर नोकरी सुध्दा गेली आहे, त्यामुळे लोकांना अधिक नैराश्य आलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News