नवऱ्याला बायको माहेरी जाणं हे कोणत्याही सुट्टीपेक्षा कमी नसतं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 14 September 2019

बायको माहेरी सर्वाधिक नवऱ्याला काय करायला आवडतं हे माहीत आहे का? पती- पत्नीच्या नात्यात प्रेम आणि भांडणं हे तर असतंच. एकत्र राहिल्यावर भांड्याला भांड तर लागणारच. पण घरात एकटं राहिल्यावर पती काय करतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बायको माहेरी सर्वाधिक नवऱ्याला काय करायला आवडतं हे माहीत आहे का? पती- पत्नीच्या नात्यात प्रेम आणि भांडणं हे तर असतंच. एकत्र राहिल्यावर भांड्याला भांड तर लागणारच. पण घरात एकटं राहिल्यावर पती काय करतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बायकोच्या अनुपस्थितीत नवऱ्याला अनेकदा मित्रांसोबत पार्टी करण्याची आयती संधी मिळते आणि तो या संधीचा पुरेपूर वापर करतो. बायको घरी असताना मित्रांना पार्टीसाठी बोलवणं प्रत्येकवेळी शक्य होतं असं नाही. पण जेव्हा संधी मिळते नवरा त्याचं सोनं करतो.

बायको घरी असताना नवऱ्याला वेळेत घरी यावं लागतं. पण जेव्हा ती घरी नसते तेव्हा प्रश्न विचारणारं कोणी नसतं. अशावेळी नवरा संधी साधत मित्र- मैत्रिणींसोबत लेट नाइट आउटिंगचा प्लॅन करतो.

बायको- मुलांसोबत फिरून कंटाळा आला असेल तर नवऱ्याला बायको माहेरी जाणं हे कोणत्याही सुट्टीपेक्षा कमी नसतं. तो आपल्या मित्रांसोबत 2-4 दिवस मोठी सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकतो.

अनेकदा पती- पत्नीमध्ये टीव्हीवरून भांडणं होतात. पण, घरी बायको नसेल तर नवरा त्याच्या आवडीचं चॅनल लावू शकतो. अशावेळी नवरा आरामात झोपून उठत त्याच्या आवडीचे कार्यक्रम पाहतो. स्वतःचा असा वेळ जो त्याला मिळतो तो पूर्ण एन्जॉय करतो.

याहून वेगळं म्हणजे जर पत्नी घरी नसेल तर घरात एकटं राहण्यापेक्षा काही पती ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करणं पसंत करतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News