कोरोनाच्या भीतीमुळे माहेरून आलेल्या पत्नीला पतीने घेतले नाही घरात, मग...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 July 2020

पोलिसांनी हे प्रकरण पतीला समजावून सांगितलं. त्यांनंतर पती पत्नीला घरी नेण्यास तयार झाला. पत्नीला घरीच होम क्वारंटाइन केलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

बेंगळूरू - कोरोनाच्या इतक्या विचित्र घटना घडत आहेत, की नातेवाईक, पती-पत्नी अशी असंख्य जवळची नातेवाईक दुरावल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत, बेंगळूरूमध्ये कोरोनाच्या भीतीमुळे माघारी परतलेल्या पत्नीला पतीने घरात घेतले नाही. विशेष म्हणजे पतीने दरवाजा उघडला नाही, कारण पतीला पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची भीती त्याच्या मनात होती. त्यानंतर हा वाद इतका वाढला की पत्नीनं तिथलं जवळचं पोलिस स्टेशन गाठलं. 

लॉकडाउनच्या काळात मागील तीन महिन्यांपासून पत्नी पंजाबमध्ये अडकून होती. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नियमावली शिथील केल्यानंतर पत्नीने सासरी परतण्याचा निर्णय घेतला. बेंगळूरूमध्ये परतल्यानंतर पत्नीनं होम क्वारंटाइन होण गरजेचं होतं. 

पंजाबवरून आलेल्या पत्नीने सासरी आल्यानंतर दरवाजा वाजवला, पण नव-याने दरवाजा उघडण्यास साफ नकार दिला. इतक्या लांबचा प्रवास करून आलेल्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला असावा अशी पतीच्या मनात शंका होती. यामुळे घरात होम क्वारंटाइन करण्याऐवजी दुस-या ठिकाणी जाण्यास सांगितले.

थकलेल्या आणि कंठाळलेल्या पत्नीला पोलिस ठाण्यात जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पतीने घरात न घेतल्याच्या रागात सरळ वार्थर पोलिस ठाणे गाठलं. मदतीसाठी महिलेने परिहार वनिता सहयावनीला (महिला हेल्पलाइन) फोनही केला. पोलिसांनी हे प्रकरण पतीला समजावून सांगितलं. त्यांनंतर पती पत्नीला घरी नेण्यास तयार झाला. पत्नीला घरीच होम क्वारंटाइन केलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News