पती-पत्नीमधील नातं अडीचशे पार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 May 2019

रंगभूमीवर नवनवीन नाटके येत असताना लीना भागवत आणि मंगेश कदम यांचे ‘के दिल अभी भरा नही’ हे नाटक विशेष लोकप्रिय ठरत आहे. उतार वयातील जोडप्यांची कथा या नाटकामधून विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे. 

आता या नाटकाचा २५० वा प्रयोग १९ मे रोजी बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात झाला. मंगेश कदम दिग्दर्शित आणि शेखर ढवळीकर लिखित या नाटकाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 

वयाची पन्नाशी गाठल्यानंतरही पती-पत्नीमधील नातं कशाप्रकारे खुलत जातं, हे अगदी सहजरीत्या ‘के दिल अभी भरा नही’मध्ये दाखवण्यात आले आहे. मंगेश-लीनाबरोबरच चंद्रशेखर कुलकर्णी, बागेश्री जोशीराव यांच्या या नाटकामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News