हमस आणि फलाफल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020
 • हमस आणि फलाफल ही एक इस्रायली पाककृती आहे. ही रेसिपी बनवण्यास अतिशय सोपी आणि जलद असल्यामुळे आशियातील मिडल ईस्ट भागात अतिशय लोकप्रिय आहे.
 • तेव्हा वेगवेगळ्या चवीचे पदार्थ ट्राय करणाऱ्या खवय्यांसाठी मी आज खास हमस आणि फलाफलची रेसिपी घेऊन आली आहे. 

हमस आणि फलाफल ही एक इस्रायली पाककृती आहे. ही रेसिपी बनवण्यास अतिशय सोपी आणि जलद असल्यामुळे आशियातील मिडल ईस्ट भागात अतिशय लोकप्रिय आहे. तेव्हा वेगवेगळ्या चवीचे पदार्थ ट्राय करणाऱ्या खवय्यांसाठी मी आज खास हमस आणि फलाफलची रेसिपी घेऊन आली आहे. 

साहित्य :-
 
हमससाठी :-

 • १/२ कप भिजलेले चणे
 • १ वाटी तीळ
 • १ कप ऑलिव्ह ऑइल
 • ३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या
 • चवीनुसार मीठ
 • १ लिंबाचा रस
 • १ चमचा अतिरिक्त ऑलिव्ह ऑइल
 • १ चमचा मिरची पावडर

फलाफलसाठी  :-

 • दीड कप भिजवलेले चणे
 • १ ते २ चमचा जिरे
 • १ ते २ कप कोथिंबीर
 • २ हिरवी मिरची
 • १ मध्यम बारीक चिरलेला कांदा
 • ३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या
 • चवीनुसार मीठ
 • १ ते २ वाटी तांदळाचे पीठ
 • तळण्यासाठी तेल

कृती :- 

हमस कृती :- 

सर्व प्रथम भिजवलेले चणे उकडून घ्या. उकडलेल्या चण्याचं पाणी पूर्णपणे निथळून घेतल्यावर मिक्सरमध्ये तीळ, लसूण, लिंबूरस, मीठ, तेल एकत्र करून एकदम बारीक पेस्ट करा . हे बनवताना तेलाचा सढळ हाताने वापर करा. ह्या पदार्थामध्ये पाणी आजिबात वापरायचे नाही, कारण हे लवकर खराब होते म्हणून काचेच्या बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवा. ६ ते ७ दिवस चांगले राहते. मिक्स सलाड मध्ये सुद्धा छान लागते. खायच्या वेळी वरून १ चमचा ऑलिव्ह ऑइल आणि चिमूटभर मिरची पावडर भुरभुरा.

फलाफल कृती :- 

भिजवलेले चणे, कोथिंबीर, लसूण, जिरे, मीठ सगळे एकत्र करून थोडेसे जाडसर वाटून घ्या. एका बाउलमध्ये हे वाटण घेऊन त्यात चिरलेला कांदा घाला. लागेल तसे तांदळाचे पीठ घालून पॅटी बनवून घ्या आणि गरम तेलात तळा. खूप मोठ्या आचेवर तळू नये नाहीतर आतून कच्या राहतात. अशाप्रकारे फलाफल आणि हमस सर्व्ह करण्यास तयार आहे!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News