हमिदवाडा येथील आयटीआयमध्ये प्रवेश सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

आयटीआय हमिदवाडा येथे ऑगस्ट २०१९ साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

म्हाकवे - आयटीआय हमिदवाडा येथे ऑगस्ट २०१९ साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता आयटीआय हमिदवाडा येथे त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य अमोल वास्कर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील एकमेव तीन शिफ्टमध्ये चालणारे ‘अ’ दर्जा प्राप्त आयटीआय आहे. 
फिटर व इलेक्‍ट्रिशियन - २१ जागा, ड्राफ्समन मेकॅनिकल - ४२ जागा (१० वी पास, २ वर्षे), पेंटर जनरल - २१ जागा (१० वी पास/नापास, २ वर्षे), शिटमेटल वर्कर - ४२ जागा, वेल्डर (६३ जागा, (१० वी पास, १ वर्षे) असे एकूण २१० जागांसाठी प्रवेश देण्यात येईल. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे आवश्‍यक आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा आयटीआय हमिदवाडा येथे ३ जून २०१९ पासून सुरू आहे. रोज सकाळी दहा ते अकरा या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन केले जाते. 

इच्छुक विद्यार्थ्यांनी आधार कार्ड, एसएससी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईट, आयकार्ड साईज फोटो २, जातीचा दाखला, NCC/MCC, ड्रॉईंगची इंटरमिजीएट परीक्षा पास असल्यास तसेच खेळात विशेष प्रावीण्य मिळविले असल्यास आदी कागदपत्रांचे झेरॉक्‍स कॉपी सोबत आणावी. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून संबंधित कागदपत्रांद्वारे पडताळणी करून अर्ज निश्‍चिती करावा. विद्यार्थ्याने एकच अर्ज कन्फर्म करावा. दोन अर्ज कन्फर्म केल्यास संबंधित विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडेल. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News