माणुसकी

अशोक पवार
Tuesday, 18 June 2019

मी,पेटवाव्या म्हणतोय 
मानवतेच्या विशाल ज्योती
तेवत ठेवावी माणुसकीची ज्योत

मी,पेटवाव्या म्हणतोय 
मानवतेच्या विशाल ज्योती
तेवत ठेवावी माणुसकीची ज्योत
अन विरत चाललेली ती नाती गोती..
 
जात,धर्म,पंथ पद प्रतिष्ठेचा वारा
वादळ होऊन जणू उच्छाद मांडतोय
त्या वादळांना रोखव म्हणतोय
उजाड झालेल्या माणुसकीच्या माळावर
छान सी माणुसकीची रोप लावावी म्हणतोय..

तेवणाऱ्या त्या प्रकाशात 
लक्ख दिसेल ती माणुसकीच्या 
माळरानावर लावलेली रोपांची रांग
येणाऱ्या जाणार्यांनी 
पुन्हा बहरेल ती माणुसकीची वाट
त्या वाटेचा थाट पुन्हा पहावा म्हणतोय..

माणुसकीच्या विझत चाललेली ज्योत 
तेवत ठेवावी म्हणतोय..!!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News