घेतलं मिठीत आणि म्हणाली...   

नागेंद्र स्वामी
Tuesday, 27 August 2019

विश्वास नव्हता कदाचित, वाटलं करेनं मी टाइमपास 
पण  माझ्या वेड्या मनाला लागलेल्या तिच्या प्रेमाचा ध्यास 

नकार होता ओठांवरती, होकार मात्र डोळ्यात
नाही नाही म्हणता म्हणता पडली ती प्रेमात 

खूप प्रयत्न केला तिला पटवायचा पण ती काय पटतचं नव्हती
एक मात्र होत माझ्याशिवाय ती लाइनंही कुणाला देतं नव्हती 

विश्वास नव्हता कदाचित, वाटलं करेनं मी टाइमपास 
पण  माझ्या वेड्या मनाला लागलेल्या तिच्या प्रेमाचा ध्यास 

माझी ही  तळमळ  पाहून, पाणी  आलं तिच्या डोळ्यात
आली जवळ, घेतलं मिठीत, लव्ह यु म्हणाली कानात

नकार होता ओठांवरती होकार मात्र डोळ्यात
नाही नाही म्हणता म्हणता पडली ती प्रेमात. 

   

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News