आता बारावीचे विद्यार्थी "नापास" होणार नाहीत; राज्य सरकारचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020
  • परीक्षेत "नापास" असा शेरा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो.

मुंबई : दहावी-बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अनेकांना या परीक्षेचं मोठ्या प्रमाणात टेन्शन असतं. मात्र दहावी सोबतच बारावीच्या विद्यार्थ्यांचा देखील ताण कमी होणार आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांवरील नापासचा शेरा पुरसण्यात येणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२० पासून "नापास" ऐवजी ‘पुनर्परीक्षेसाठी पात्र’ असा शेरा देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

 

परीक्षेत "नापास" असा शेरा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे "फेल" ऐवजी  'एलिजिबल फॉर ओन्ली स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम' असा शेरा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर असणार आहे. यंदाच्या निकालापासून हा बदल करण्यात येणार आहे, असं शासन निर्णयात देण्यात आलं आहे. 

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात नापास झाल्यास गुणपत्रिकेत फेल ऐवजी 'एलिजिबल फॉर ओन्ली स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम' असा शेरा देण्यात येतो. त्यानुसारच आता बारावीच्या गुणपत्रिकेतही त्याप्रकारे शेरा देण्यात येणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News