HSC Result: आता ऑनलाईन पुनर्मुल्यांकणासाठी अर्ज करता येणार; जाणून घ्या प्रक्रीया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 July 2020

विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकेचे तीन प्रकारे मुल्यामापण करता येणार आहे. गुणपडताळणी, पूनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिका फोटो कॉपी या पर्यायांचा वापर विद्यार्थी- पालकांना उपलब्ध आहे.

मुंबई : कोरोनामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला बारावी एसएससी मंडळाचा निकाल अखेर जाहीर झाला. निकालाची तारीख जाहीर झाल्यापासून विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला होता. निकाल पाहण्याची उत्सूकता शिगेला पोहचली होती. केव्हा एकदाचा निकाल पाहतो अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर निकाल लागून सर्वांचे गुणपत्रक विद्यार्थ्यांच्या हाती आले. उत्तम पेपर सोडवूनही काही विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी पुनर्रमुल्यांकणाचे तीन पर्याय एसएससीकडून उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. घरी बसून पुनर्रमुल्यांकणासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी परीक्षा मंडळाच जाण्याची गरज नाही.   

मुल्यामापणाचे तीन पर्याय 

विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकेचे तीन प्रकारे मुल्यामापण करता येणार आहे. गुणपडताळणी, पूनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिका फोटो कॉपी या पर्यायांचा वापर विद्यार्थी- पालकांना उपलब्ध आहे. गुणपडताळणीमध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिका तपासली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक आणि नाव यांची पडताळणी करतात. त्यानंतर उत्तर पत्रितेवरचे मार्क आणि निकालावरचे मार्क समान आहेत का याची पडताळणी करुन विद्यार्थ्यांना कळवले जाते. पुनर्रमुल्यांकनात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या जातात. पेपर तपासण्यासाठी एक समिती स्थापन केली जाते, त्या समितीद्वारे पेपर पुन्हा तपासले जातात. आणि पुन्हा मार्कींगची बेरीज केली जाते. पेपर तपासणीत चुक झाल्यास दुरुस्ती करुन दिले जाते. विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी विद्यार्थ्यांना दिली जाते.  

अर्ज कसा करावा

उत्तरपत्रिका मुल्यामापणासाठी http://verification.mh-hsc.ac.in/ या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी किंवा पालकांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करताना मुल्यांकणाचे तीन पर्याय दिले जातील. त्यातीत एक पर्याय निवडून अर्ज संबमीट करायचा आहे. त्यानंतर ३०० रुपये फी भरावी लागणार आहे. फीस भरन्यासाठी नेट बॅंकींग, डेबिट, क्रेडीट, आणि युपीआय असे चार पर्याय देण्यात आले. कोणत्याही एका पर्यायाचा वापर करुन फी भरात येणार आहे. फी भरल्यानंतर अर्ज पुर्ण होईल. बारावी निकाल लागल्यापासून सात दिवसात उत्तर पत्रिका मुल्यामापणासाठी अर्ज करता येईल. १७ जुलैपासून २७ जुलैपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) विद्यार्थ्यांना मुल्यमापनाचा अर्ज करता येणार आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News