अशा देशात कसा टिकेल तरुण?

सोनल मंडलिक
Tuesday, 4 June 2019

देशात मोठ्याप्रमाणात रोजगारी वाढली आहे. २०१४ मध्ये भाजपा सरकार आल्यानंतर मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात आश्वासने दिली होती. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये देखील मोदी सरकारने त्याचप्रमाणे आश्वासने दिली. मात्र या आश्वासनांची पूर्तता झालीच नसल्याचं दिसून येत आहे. देशातील वाढती बेरोजगारी कमी करण्यात मोदी सरकार फोल ठरले आहे. देशातील बेरोजगारीचा आलेख हा वाढत असल्याचे समोर आले आहे. एकीकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचा दावा मोदी सरकारकडून होत असताना या देशातील तरुण बेरोजगारीच्या विळख्यात आहे. 

मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वीच सत्तेत आल्यानंतरच रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र त्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकली नाही. सांख्यिकी मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार हा दर ६.१ टक्के इतका आहे. बेरोजगारीची ही टक्केवारी गेल्या ४५ वर्षातली सर्वाधिक असल्याचंही समोर आलं आहे. २०१७-१८ या वर्षात बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षातला सर्वाधिक आहे हेच या अहवालावरून स्पष्ट होते आहे. तसेच देशातील बेरोजगाराची समस्या किती गंभीर बनली आहे, हे सरकारच्याच आकडेवारीमुळे दिसून आले आहे. 

देशापुढे अनेक समस्या निर्माण झालेल्या असताना बेरोजगारी ही गंभीर समस्या बनत आहे. देशात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, मात्र तरी देखील तरुण बेरोजगार कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे. रोजगारासाठी तरुण गावाकडून शहराकडे वळत आहेत. मात्र शहरात देखील तीच परिस्थिती असून उच्च शिक्षित तरुण बेरोजगार आहेत. यामध्येच मराठा आरक्षण, शैक्षिणक संस्थांचा गोंधळ या सर्व गोष्टी उभ्या ठाकल्या आहेत. जागा १ आणि उमेदवार अनेक अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. देशाचं भवितव्य हे आजच्या तरुणांच्या हाती असताना बेरोजगारीमुळे अशा देशात तरुण टिकेल कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News