सावधान: शरीरावर टॅटू गोंदवून घेताय: होऊ शकतो HIV सारखा जीवघेणा आजार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 10 September 2019

गेल्या काही वर्षणापासून तरुणांमध्ये टॅटू काढून घेणे हा ट्रेण्ड झाला आहे. दिवसेंदिवस हा ट्रेंड वाढत चालला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, टॅटूमुळे HIV, मलेरिया किंवा डेंग्यूसारखे भयंकर आणि जीवघेणे आजार होऊ शकतात. 

पुणे : गेल्या काही वर्षणापासून तरुणांमध्ये टॅटू काढून घेणे हा ट्रेण्ड झाला आहे. दिवसेंदिवस हा ट्रेंड वाढत चालला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, टॅटूमुळे HIV, मलेरिया किंवा डेंग्यूसारखे भयंकर आणि जीवघेणे आजार होऊ शकतात. 

अनेकदा आपण योग्य माहिती न घेताशरीरावर टॅटू गोंदवूनघेतो तसेच टॅटू गोंदवताना फारशी काळजीही घेत नाही, त्यामुळे असे प्राणघातक आजार होतात. टॅटूमुळे कशाप्रकारे आजार पसरू शकतात त्याबद्दल जाणून घेऊ...

जेव्हा तुम्ही टॅटू गोंदवायला जाता तेव्हा सुईच्या सहाय्याने रंग शरीराच्या आत टाकला जातो. जेव्हा सुई शरीरात जाते तेव्हा तिचा संपर्क रक्ताशी येतो. तुम्ही टॅटू गोंदवून घेण्यापूर्वी HIV, मलेरिया किंवा डेंग्यूचा एखाद्या रुग्णाने टॅटू काढला असेल तर त्यामुळे तुम्हालाही हे आजार होऊ शकतात.

अशा पद्धतीने करा स्वतःचं संरक्षण-

शरीरावर टॅटू गोंदवून घेण्यापूर्वी तुमच्यासाठी वापरण्यात येणारी सुई चांगल्या पद्धतीने धुवून घेतली की नाही याकडे लक्ष द्या. नवीन सुईने टॅटू काढून घेणं केव्हाही चांगलं. जर सुई चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून घेतली नसेल तर तिथून टॅटू काढू नका.

कोणत्याही सामान्य ठिकाणावरून टॅटू काढून घेऊ नका. ज्या ठिकाणाहून तुम्ही टॅटू काढून घेणार आहात तिथली चांगल्याप्रकारे चौकशी करा. त्यांच्याकडे टॅटू काढण्याचं लायसन्स आहे की नाही याचीही विचारणा करा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News