चांगले सेल्फी कसे घ्यायचे? या ट्रीक्स वापरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019

आपलेच सेल्फी निट येत नाही असं प्रत्येकाला वाटतं. तेव्हा चांगले सेल्फी कसे घ्यायचे? यासाठी या ट्रीक्स नक्की वापरा.

फोटो काढण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा सेल्फी घेणं केव्हाही योग्य ठरतं. सध्या सेल्फीचा जमाना आहे. मात्र २०-२५ सेल्फी क्लिक केल्यानंतर आपल्याला एखादा सेल्फी आवडतो. आपलेच सेल्फी निट येत नाही असं प्रत्येकाला वाटतं. तेव्हा चांगले सेल्फी कसे घ्यायचे? यासाठी या ट्रीक्स नक्की वापरा.

- शक्य असेल तेव्हा नॅच्युरल लाइटमध्येच सेल्फी घ्या. सेल्फी अधिक सुंदर येतात. 
-  जिथे कमी प्रकाश असेन तिथे सेल्फी घेणं शक्यतो टाळा. कमी प्रकाश असला तर अनेकदा आपण फ्लॅशचा वापर करतो. मात्र फ्लॅशच्या उजेडामुळे अधिक प्रकाश येतो यामुळे सेल्फी तितकासा चांगला दिसत नाही. 
- फोटो काढताना केवळ पूर्णपूणे तुमचाच चेहरा दिसेन असा सेल्फी काढू नका. बाजूच्या निगेटीव्ह स्पेसला महत्त्व दिलं की सेल्फी अधिक चांगला दिसतो. 
-  तुमच्या फोनमधल्या पोट्रेट मोडचा वापर सेल्फी काढण्यासाठी सर्रास करू नका. जर बॅकग्राऊड खूपच व्यग्र असेन तर अशा वेळी पोट्रेट मोडचा वापर करून सेल्फी काढा. 
- फिल्टरचा वापर करून सेल्फी काढताना शक्यतो सेल्फी जास्तीत जास्त  नॅच्युरल वाटेन हे पहा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News