कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांनी कशाप्रकारे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे ? वाचा तरूणाईचं मतं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांनी कशाप्रकारे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे ? वाचा तरूणाईचं मतं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांनी कशाप्रकारे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे ? वाचा तरूणाईचं मतं

अनेक वर्षांची सार्वजनिक गणपती बसवण्याची परंपरा खंडीत झाली असं काही जणांना वाटतं. पण कोरोनाची लढाई आपण मागील ५ महिन्यांपासून लढतोय. आत्तापर्यंत कोरोना विरूध्द झालेला संघर्ष आपण पाहिला. सरकारकडून अधिक गर्दी न करण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला सुध्दा देण्यात आला आहे. या अनुशंगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांनी कशाप्रकारे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे ? या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रुपमध्ये आज मनसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडकं मतं आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

सार्वजनिक गणेशोत्सव हा आपल्या आपुलकीचा आणि श्रद्धेचा विषय आहे. लोकमान्य टिळकांनी लोकांना संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. पण आज गणेश उत्सव सामाजिक बांधिलकी जपून साजरा केला पाहिजे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या देणगीचा वापर आरोग्यसेवा गोरगरिबांच्या मदतीसाठी केला पाहिजे. कोरोनाच्या काळात अनेकांचे कामधंदे बंद पडले आहेत. त्यांना आपण अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचा पुरवठा सार्वजनिक गणेश मंडळामार्फत करू शकतो. यावर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून अनेकांना मदत करून खरी समाज सेवा करू शकतो.  

- निसार नायकवडी (फौजी)

गणेशोत्सव हा सण साजरा करण्यामागे उद्देश असतो, लोकांनी एकत्र यावे. त्या उत्सवाचा एकत्रपणे आनंद  घेतला पाहिजे. पण आताच्या काळात लोकांनी एकत्र येणे आरोग्याला हानिकारक आणि धोकादायक असे आहे. मग असा उत्सव साजरा करणे कोरोना रोगाला तो वाढण्याची आयती संधी मिळेल. त्यासाठी मंडळानी खूप मोठी सजावट मूर्ती बनवण्यापेक्षा छोटी खान मूर्ती बसवून गणेश उत्सवाचा आनंद घ्यावा. जे काही मोठ्या उत्सवावर खर्च केला जातो. तो कोविड-19 ग्रस्त आणि या काळात ज्यांचा रोजगार गेला आहे आणि दोन वेळच्या अन्नाला मुकत आहेत, अशा गरजू लोकांना मदतीसाठी त्याचा उपयोग करावा. यामुळे लोकही सुरक्षित राहतील आणि 2020 चा गणेश उत्सव देखील वेगळ्या पद्धतीने साजरा होईल आणि विनाकारण कोणता खर्च होणार नाही.

- स्वाती शेषराव बडे (रूईया कॉलेज)

कोरोनाचे सावट असताना देखील काही नियमावली मध्ये सगळ्यांना सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास मिळत आहे ... ही गोष्ट आनंददायी असून ..प्रत्येक शहरातल्या सगळ्या नगरसेवकांनी एकत्र येऊन...पूर्वी जसे "एक गाव एक गणपती " अशी रीत पुन्हा सुरू करावी...तसेच मंडळातील लोकांनी ह्या गोष्टीला दुजोरा देत ...सामाजिक भान जपून ...ज्यांना ह्या संकटात आपले काम किंवा रोजगार गमवावे लागले आहे ...किंवा ज्यांना काही कारण स्तव आपल्या गावी जाता येत नसेल ..अश्यांचा शोध घेऊन ..त्यांना आर्थिक रित्या मदत करून ...माणुसकीचे भान जपले तर नक्कीच एक प्रकारे देवाची सेवा केल्याचे समाधान आहे ...

मोठं मोठे स्पीकर लावून रात्री मंडळात पत्ते खेळण्यापेक्षा ...आता पावसाने आणि कोरोनाने माणसाची केलेली गळचेपी लक्षात घेता ..ठीक ठिकाणी एक संघटने प्रमाणे एकत्र येऊन अडचणीत असलेल्यांसाठी किंवा ज्यांनी रोजगार गमावले किंवा ह्या सगळ्या कारणांनी हातातून काम निघून गेले आहे अश्यांना काही प्राथमिक गरज आहे का असेल तर काय करता येईल ...ह्याचा विचार, नियोजन करणे महत्वाचे...जेणेकरून जे जगण्याच्या भीतीपोटी,नैराश्यात किंवा आता जगू कसे ह्या विचाराने ग्रस्त होऊन आत्महत्या करत आहेत त्यावर थोडस का होईना पण ह्या आत्महत्या थांबवण्यात नक्कीच यश मिळेल... सोशल डिस्टनसिंग चा विचार करून त्या प्रमाणे कृती करून सार्वजनिक मंडळांनी आपला उत्सव सार्थकी लावणे गरजेचे...आणि मंडळांनी आपापसात शर्यत करण्या पेक्षा आपापल्या शहरासाठी गावासाठी काय गरजेचे आहे..माझे शहर कसे निरोगी होईल...ह्या कडे लक्ष दिले पाहिजे...जेणेकरून गावातील लोकांना आपण  स्वतः जबाबदार नागरिक आहोत ...अशी समजूत होईल..आणि आपोआपच कोरोनाचे संकट लक्ष्यात घेऊन माणुसकी आणि सामाजिक बांधीलकी निभावली जाईल.. आणि लवकरच हा देश ह्या संकटातून मुक्त होईल...अशी आशा

- हर्षदा पाटे

गणेश उत्सव हा सण भारत भरात नव्हे, तर परदेशात राहणारे भारतीय लोक सुद्धा साजरा करतात. दरवेळेस हा सण ज्या आनंदात साजरा केला जातो. तो आनंद आता कोविड-19 मुळे ह्या वर्षी करायला जमणार नाही. वेगवेगळ्या गणेश मंडळांनी ह्या वेळेस हा सण शांततेत जास्त लोक जमणार नाहीत ह्याची दक्षता घ्यावी. दर्शन लांबूनचं लोकांना द्यावे, वाजा-घाजा जास्त करू नये, लोकांना शारीरिक अंतर ठेवण्यास प्रेरित करावे. मास्कचा वापर करावा सर्व भक्तांना आणि कार्यकर्त्यांना बंधनकारक असावे, अशा पध्दतीने सर्व गणेश मंडळांनी ह्या वेळेस सण साजरा करा

- विजयकुमार कटारे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News