गोपनीय मेल कसा पाठवावा?

ऋषिराज तायडे
Tuesday, 4 June 2019
  • सरकारी कार्यालय किंवा अर्थविषयक संस्थेत संदेशांचे आदान-प्रदान करताना गोपनीयता पाळण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातात.
  • विशेषतः ई-मेलच्या माध्यमातून गोपनीय संदेश कसे पाठवावेत, याबाबत...  

गुगलच्या वतीने संवेदनशील संदेश पाठवण्यासाठी गेल्या जून २०१८ मध्ये जी-मेलवर कॉन्फिडेन्शियल मोड सुरू केला होता. त्यामुळे एका ठराविक कालावधीनंतर सदर संदेश डिलिट व्हायचा किंवा प्राप्तकर्त्याला तो संदेश कॉपी करण्यास, पुढे फॉरवर्ड करण्यास आणि डाऊनलोडिंग करण्यापासून परावृत्त करता येते. नुकत्याच चर्चेत आलेल्या जी-सूट वापरकर्त्यांना जी-मेल वापरताना कॉन्फिडेन्शियल मोडचा वापर करता येणार आहे.

ही सेवा येत्या २५ जूनपासून सुरू होणार आहे. हे फीचर स्वतःहून सुरू होणार असून हवे त्या वेळी ते बंद करता येणार आहे. म्हणजे ज्या कंपन्या कार्यालयीन कामकाजासाठी आणि माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी जी-मेलचा वापर करतात, त्यांच्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे. सध्या वापरकर्त्यांना त्यांच्या डेक्‍सटॉप आणि मोबाईल ॲपवरून जी-मेल वापरताना संवेदनशील संदेश कसा पाठवावा, याबाबत जाणून घेऊया...

ब्राऊजरसाठी
मेल कम्पोज करताना ‘सेन्ड’ बटनच्या उजव्या बाजूला असलेल्या लॉक्‍ड क्‍लॉकच्या (घड्याळ) चिन्हावर क्‍लिक करा. त्यानंतर एक पॉप-ॲप येऊन प्राप्तकर्त्याला तुम्ही पाठवलेला संदेश किती वेळ वाचता येईल, याची नोंद करता येईल.

अधिक सुरक्षिततेसाठी तुम्ही मेलवर पासवर्ड लावू शकतात, जो प्राप्तकर्त्याच्या मोबाईलवर संदेश स्वरूपात पाठवला जातो. तुम्ही पाठवलेला संदेश संवेदनशील असल्याचा संदेश आलेल्या मेलच्या तळाशी दिलेला असतो.

जी-मेल ॲपसाठी
ब्राऊजर आणि ॲपवरील जी-मेलच्या या सुविधेमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. ॲण्ड्रॉईड आणि आयओएस ॲपवरील वरील प्रक्रिया सारखीच आहे. सुरुवातीला मेल कम्पोझ केल्यावर उजव्या बाजूला वरील भागात तीन डॉट दिसतील. त्यावर क्‍लिक करून कॉन्फिडेन्शिअल मोड सुरू करा.
त्यानंतर प्राप्तकर्त्याला सदर मेल किती वेळपर्यंत हाताळता येईल, त्याची वेळ नोंदवता येणार आहे. तसेच त्या मेलला पासवर्ड लावून तो अधिक सुरक्षितदेखील करता येतो.

वरील सेटिंग केल्यावर पाठवलेल्या मेलच्या तळाशी सदर संदेश गोपनीय असून काही वेळात तो एक्‍सपायर होणार असल्याची सूचना दिलेली असते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News