१० दिवसात घटवा १० किलो वजन; हा डायट प्लान फॉलो करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019

वजन कमी करण्यासाठी हेल्दी लाइफस्टाईलसोबत संतुलिक डायट असणे देखील तितकंच गरजेचे आहे. जर का तुम्हांला १० दिवसांत १० किलो वजन घटवायचे असेल तर आम्ही सांगितलेला डायट प्लान फॉलो करा.

वजन कमी करण्यासाठी हेल्दी लाइफस्टाईलसोबत संतुलिक डायट असणे देखील तितकंच गरजेचे आहे. जर का तुम्हांला १० दिवसांत १० किलो वजन घटवायचे असेल तर आम्ही सांगितलेला डायट प्लान फॉलो करा.

सकाळी उठल्यावर हे करा 
वजन घटवण्यासाठी शरीरातील टॉक्सिन निघणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा डिटॉक्स वॉटर किंवा दोन ग्लास गरम पाणी प्यावे. असे केल्यास शरीरातील कॅलेरीज बर्न होण्यास मदत होते. जवळपास एक महिना हे पाणी प्यावे. 

असा नाश्ता खावा 
वजन कमी करण्यासाठी असा नाश्ता खावा जो २५० कॅलेरीजच्या आत येत असेल. त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार ओट्स, रवा, ऑमलेट, ब्राऊन ब्रेड, स्किम मिल्क किंवा पोहे असे पदार्थ खावे. 

दोन-दोन तासाला काहीतरी खावे
वजन कमी करत असताना दर दोन-दोन तासाला काहीतरी खावे. त्यामुळे जेव्हा भूक लागल्यास ग्रीन टीसोबत बिस्कीट खाऊ शकतात. तुम्हाला हवे असल्यास फळांमध्ये केळं, सफरचंद, टरबूज आणि संत्र खाऊ शकता. 

दुपारच्या जेवणात हे असावे 
दुपारच्या जेवणात तुमची इनटेक कॅलरी ही ३०० हून अधिक नसावी. अशावेळी दुपारच्या जेवणात व्हेज सूप, ब्राऊन राईस, डाळ, मासे, अर्धा कप स्टीम व्हेजिटेबल राईस, मल्टीग्रेन चपाती सोबत हिरवी भाजी किंवा डाळ खाऊ शकता. अंड्याचा सॅडविच देखील तुम्ही खाऊ शकता. भाजी कमी तेलात शिजवाव्या आणि व्हाईट ब्रेड खाऊ नये. 

संध्याकाळचा नाश्ता 
संध्याकाळी ६ च्या दरम्यान जास्त भूक लागल्यास कोणतंही फळं, ड्राय फ्रूट्स, ग्रीन टी, उकडलेली अंड्यांचा सफेद भाग, संत्राचा ज्यूस किंवा ग्रील व्हेज सॅडविच खाऊ शकता. 

रात्रीचे जेवण
रात्रीचे जेवणे नेहमी हलकंच असावं. अशातच उकडलेले चिकन ब्रेस्टसोबत उकडलेल्या भाज्या खाऊ शकता. तुम्ही २ मल्टिग्रेन चपातीसोबत अर्धा कप चिकन करी किंवा उकडलेली भाजी खाऊ शकता. 

झोपण्यापूर्वी फॅट कटर ड्रिंक प्यावे
दिवसभरात रात्री झोपण्यापूर्वी फॅट बर्निंग ड्रिंक घेतल्याने वजन लवकर कमी होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News