शिक्षणमंत्री महोदय आणखी किती दिवस घेणार ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020

बॅकलॉग व एटीकेटीच्या संदर्भात विद्यार्थी नेते श्रीकांत जाधव यांचा सवाल

नांदेड : अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय घेताना बॅकलॉग व एटीकेटी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी सांगितले. त्यानंतर एक महिना झाला तरी शिक्षण मंत्र्यांनी बॅकलॉग व एटीकेटी संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. मंत्री महोदय आणखी किती घेणार? बॅकलॉग व एटीकेटी विद्यार्थ्यांचा संभ्रम केंव्हा दूर करणार? असा सवाल विद्यार्थी नेता तथा मराठवाडा असोसियशन फॉर स्टुडंटचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी उपस्थित केला.

कोरोनाच्या प्रार्श्वभुमीवर राज्यातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. विद्यार्थी संघटनांनी देखील त्यांचे आभार मानले. मात्र राज्यातील एटीकेटी विद्यार्थ्यांसंदर्भात कोणती अधिसूचना काढण्यात आली नाही. त्यामुळे बॅकलॉग व एटीकेटीचे विद्यार्थी सभ्रमात आहेत.

राज्यात बॅकलॉग व एटीकेटी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 4 लाखांपेक्षा अधिक आहे. त्यांची परीक्षा होणार की नाही? परीक्षा झाली तर कशी होणार? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी संभ्रम आहेत. मुख्यमंत्र्यांनी बॅकलॉग व एटीकेटी संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा अशी विनंती इ-मेलद्वारे जाधव यांनी केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News