उसासा...

अमायरा अमर महाडीक.
Tuesday, 26 February 2019

ओरबाडूनी स्वतःला 
घायाळ रे मी केले..
पडले बेवारस जिथे,
ती वहिवाट होती..

कळले उशिराने,
ती पळवाट होती.
आलाप केविलवाणा,
की मंद हो उसासा...

माझीच माझ्या मनाशी,
ती वाटाघीट होती.
ओरबाडूनी स्वतःला 
घायाळ रे मी केले..

पडले बेवारस जिथे,
ती वहिवाट होती..
ओठांस कडी घालूनी,
भ्याड परागंदा मी झाले..

कत्तल केली मीच माझी,
ती वेळ मोकाट होती.

  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News