जाणून घ्या ! कोणत्या विभागात किती प्रवाशांनी घेतला एटीचा लाभ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 23 May 2020

दिवसभरात 457 निवडक मार्गांवर एसटीच्या 2007 फेऱ्या झाल्या. त्यातून 11 हजार 151 प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंग राखत प्रवास केला.

मुंबई : लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने बंद असलेले एसटीचे चाक शुक्रवारपासून (ता. 22) पुन्हा धावू लागले. राज्यातील रेड झोन व कंटेन्मेंट झोन वगळता एसटी महामंडळाच्या 31 विभागांनी शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या. दिवसभरात 457 निवडक मार्गांवर एसटीच्या 2007 फेऱ्या झाल्या. त्यातून 11 हजार 151 प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंग राखत प्रवास केला. मजूर, शेतकरी, सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेकांनी या सेवेचा लाभ घेतला. आपली लाडकी एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला.

विभाग - फेऱ्या - प्रवासी संख्या
पुणे - 288 - 752
नाशिक - 420 - 1159
नागपूर- 599 - 3225
अमरावती - 378 - 1872
मुंबई - 205 - 893
औरंगाबाद - 716 - 3251
एकूण - 2007 - 11151

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News