सोनु सुदला दररोज किती नागरिक मागतात मदत? आकडे वाचून थक्क व्हाल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 August 2020

गुरुवारी सोनुने एक ट्विट करुन मदत मागणाऱ्यांची आकडेवारी प्रसिद्ध केली.

मुंबई : चित्रपटातला विलन खऱ्या अर्थाने समाजाचा हिरो बनला आहे. अभिनेता सोनू सुदचे कार्य पाहून अनेकांना अभिमान वाटतो. चित्रपटात विलनची तोख भुमीका बजावणारा कलाकार सोनू वास्तवातला हिरो झाला आहे. लॉकडाऊन काळात त्यांनी लाखो कामगारांना सढळ हातातने मदत केली. विदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्याचे महत्त्वपुर्ण काम केले. तसेच बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली, त्यामुळे सोनुकडे दिवसेंदिवस मदत मागण्याचा ओध वाढत आहे. गुरुवारी सोनुने एक ट्विट करुन मदत मागणाऱ्यांची आकडेवारी प्रसिद्ध केली. ही आकडेवारी वाचून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सरकार पेक्षा अधिक मागणीचा ओघ सोनूकडे सुरु आहे.

पाहा ट्विट

 

सोनूकडे गुरुवारी (ता. २०) १ हजार १३७ ईमेल, १९ हजार फेसबुक संदेश, ४ हजार ८१२ इन्टाग्राम मॅसेज, ६ हजार ७४१ ट्विट मदतीसाठी पाठवण्यात आले आहेत. 'सरासरी दररोज ३१ हजार मॅसेज येतात. एक माणून म्हणून सर्व मॅसेजला रिप्लाय देणे शक्य नाही, तरी देखील जास्तीजास्त व्यक्तीना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे' असे सेनुने सांगितले. 

सोनु सुदनवर पुस्तक येणार

'मी जर तुमचा मॅसेज वाचू शकलो नाही तर माफी असावी' असे सोनुने आपल्या चाहत्यांकडे भावना व्यक्त केली आहे. सोनुने लॉकडाऊन काळात लाखो जनतेला मदत केली त्यावर एक पुस्तक लिहण्याच काम सुरु आहे. काही दिवसात हे पुस्तक प्रकाशिक होईल, आणि देशातली प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News