पावसाळ्यात मेकअप नेमका कसा करावा? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019

पावसाळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला कायम सतावत असते ती म्हणजे मेकअप. पावसाळ्यात मेकअप नेमका कसा करावा? सौंदर्य प्रसाधनांच्या गर्दीतलं नेमकं काय आपल्या चेहऱ्यासाठी गरजेचं आहे? पावसाच्या सरी आणि आजूबाजूच्या हिरव्यागार वातावरणामध्ये आपलेही सौंदर्य खुलून दिसावे असे प्रत्येकालाच वाटते; परंतु मेकअप केला तर तो पावसाने निघून जाण्याची शक्यता असते. यामुळे अनेकांना विशेषत: स्त्रियांना हा प्रश्न पडतो म्हणून आम्ही पावसाळ्यात मेकअप करण्यापूर्वी उपयोगी येणाऱ्या काही हलक्या फुलक्या टीप्स देत आहोत. 

- मेकअप करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे शक्यतो कमीत कमी मेकअप आणि साधा लूक ठेवण्याचा प्रयत्न करा. 
- पावसाळ्यात क्रिम बेस सौंदर्यप्रसाधनं वापरणं टाळा, कारण आर्द्रता असल्यानं चेहरा अधिक तेलकट दिसू लागतो.
- अशावेळी पावडर बेस सौंदर्यप्रसाधनं वापरा. कारण पावडर तेलकटपणा शोषून घेते. आर्द्रता असल्यानं पावडर बेस फाऊंडेशन चेहऱ्यावर टिकूनही राहतात. 
- लिपस्टिकचे  रंग निवडताना या मोसमात गडद आणि ग्लॉसी शेड्स असणाऱ्या लिपस्टिक वापरणं टाळा. त्याऐवजी  मॅट शेड्सनां प्राधान्य द्या.
- पिंक, सॉफ्ट ब्राऊन अशा शेड्स निवडा. मात्र तो क्रिम किंवा ग्लॉस बेस असता कामा नये हे लक्षात ठेवा. 
पावसासाठी वॉटरप्रुफ मस्कारा वापरा. कलर  पेन्सिलचाही तुम्ही वापर करू शकता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News