ब्रेकअपनंतरही एक्स सोबत मैत्री ठेवता येऊ शकते? 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

ब्रेकअपनंतर लगेच नकळतपणे तुम्ही तुमच्या एक्सचा द्वेष करु लागता. मात्र, ब्रेकअपनंतरही एक्स सोबत मैत्री कायम ठेवता येऊ शकते असा काही लोकांचा विश्वास आहे. त्यासाठी दोघांकडून समजूतदारपणा अपेक्षीत आहे.

मुंबई : भरपूर वादविवादानंतर ब्रेकअप झाला असल्यास गैरसमज दूर होण्यास वेळ लागतो. वादविवाद लवकर मिटत नाहीत. पण, ब्रेकअप सहमतीने झाला असल्यास पुन्हा मैत्री होऊ शकते. जेव्हा ब्रेकअप होतो तेव्हा तुम्ही काय करता? सर्वसाधारणपणे ब्रेकअपनंतर मैत्रीदेखील तुटते. ब्रेकअपनंतर लगेच नकळतपणे तुम्ही तुमच्या एक्सचा द्वेष करु लागता. मात्र, ब्रेकअपनंतरही एक्स सोबत मैत्री कायम ठेवता येऊ शकते असा काही लोकांचा विश्वास आहे. त्यासाठी दोघांकडून समजूतदारपणा अपेक्षीत आहे.

ब्रेकअपनंतरही एक्स सोबत तुम्हाला मैत्री ठेवायची असल्यास या चार गोष्टी लक्षात ठेवा

१) संवाद साधताना प्रियकर जर तुमच्याशी मोठ्या आवाजात बोलत असेल किंवा सतत रागवत असल्यास त्याला स्पेस द्यावी. थोड्या कालावधीनंतर गोष्टी सुधरु शकतील.

२) ब्रेकअपमुळे होणाऱ्या गैरसमजातून मुलगे अनेक भावना मनात ठेवतात. अशाप्रसंगी, त्याच्या भावना व्यक्त करण्याची मोकळीक द्या. त्याची बाजू मांडण्यासाठी संधी द्या. संवादातून द्वेष कमी होईल.

३) ब्रेकअपची कारणे विनम्रतेने पटवून देण्याचा प्रयत्न करावा. पण, यामध्ये स्वत:ला दोषी न मानता मुद्दे समजून देण्याचा प्रयत्न करा.

४) ब्रेकअपनंतरही एक्ससोबत पुन्हा संवाद साधता आणि तरीही तुमचा एक्स माफी द्यायला किंवा मैत्री करायला तयार नसेल तर, तुम्ही घेतलेल्या निर्णयासोबत मुव्ह ऑन करा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News