मुलीला पटवण्यासाठी अट्रॅक्ट करण्याच्या काही टिप्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 April 2019

मुलीला पटवण्यासाठी तिच्या कॉलेज फ्रेंड किंवा सोशल मीडियावर फ्रेंड असणे गरजेचे नाही. तसे तर चित्रपट दाखवल्या प्रमाणे पहिल्या नजरेत सुद्धा प्रेम होऊ शकते. त्यासाठी मुलीला अट्रॅक्ट करण्यासाठी तिला चारचौघात असतानाच आपल्याकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. बघा काही टिप्स तिला पटवण्यासाठी:

मुलीला पटवण्यासाठी तिच्या कॉलेज फ्रेंड किंवा सोशल मीडियावर फ्रेंड असणे गरजेचे नाही. तसे तर चित्रपट दाखवल्या प्रमाणे पहिल्या नजरेत सुद्धा प्रेम होऊ शकते. त्यासाठी मुलीला अट्रॅक्ट करण्यासाठी तिला चारचौघात असतानाच आपल्याकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. बघा काही टिप्स तिला पटवण्यासाठी:

हसी तो फशी
हा फंडा किती जरी जुना असला तरी प्रभावी आहे. सगळ्यासोबत असतानाही तिच्याशी नजर मिळवताना एक रोमँटिक हसू आपलं काम करू शकतं. आपल्या डोळ्यात आणि हसण्यात रोमांस जाणवला की ती लगेच काही रीऍक्ट करेल. तिला आकर्षण असल्यास ती पुन्हा नजर मिळवून स्माईल देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.

किंचित कौतुक करा 
इम्प्रेस करण्यासाठी उगाच कौतुक करत बसू नये. केवळ एका वाक्यात प्रामाणिक स्तुतीमुळे तिचं मन जिंकता येईल. मग ते कौतुक तिच्या दिसण्यावर नसून तिचे विचार किंवा आयडियाजवर असलं तरी आपलं काम होईल.

ड्रेसिंग सेंस 
स्वत: नेहमी टिपटॉप राहावे. आपण देखणे असला तरी राहणी व्यवस्थित असली की मुली पटकन इम्प्रेस होतात.

खोटं बोलणे टाळा
आकर्षित करण्याच्या नादात शोऑफ करणे चुकीचे ठरेल. आपल्या तिच्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा असेल तर स्वत:बद्दल खोटं मांडू नका. हवं तर कमी बोला पण खरं बोला.

थट्टा पण मर्यादित
मुलीला आकर्षित करण्यासाठी सेंस ऑफ ह्यूमर असणे आवश्यक आहे परंतू अती थट्टा नको. तिचा स्वभाव कळत नाही तोपर्यंत मर्यादा पाळावी. आणि पर्सनल कमेंट्स टाळावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News