ग्रामीण विकासात तरुणाईचा सहभाग किती आवश्यक आहे?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 August 2020
  • आजची चर्चा, माझा आधिकार, माझे मत
  • शहराचा विकास झपाट्याने होत आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास होत नाही. भारत विरुद्ध इंडिया अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली.

मुंबई : भारत हा तरुणाईचा देश आहे. तरुणाई देशात मोठा बदल घडवू शकते यावर जनतेचा विश्वास आहे. एखाद्या समाजकार्यात तरुणाईने पुढाकार घेतल्यास त्याला लोकचळवळ प्राप्त होते. आशा चळवळी शहरात निर्माण झाल्या. शहराचा विकास झपाट्याने होत आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास होत नाही. भारत विरुद्ध इंडिया अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली. अशा परिस्थितीत 'ग्रामीण विकासात तरुणाईचा सहभाग किती आवश्यक आहे? या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपमध्ये  आज मनोसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

ग्रामीण विकासात तरुणांनी पुढाकार घेऊन योगदान दिलेच पाहिजे. ग्रामीण भागात भारतीय संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचे सामर्थ्य आहे. ग्रामीण भागातील जीवन हे सर्वोत्तम आहे. चांगली स्वच्छ निर्मळ हवा, मुबलक पाणी आणि माणुसकी जपणारी माणसे हे फक्त ग्रामीण भागात बघायला मिळेल. ग्रामीण भागातील लोकांना फक्त प्रेमाची आवश्यकता असते. तुम्ही कोणत्याही गावात जाऊन प्रेमाने दोन शब्द बोला ती लोक तुम्हाला देवासारखे समजतील. ग्रामीण भाग हा आपल्या देशाचा मुख्य कणा आहे, असे मला वाटते. त्यामुळे सर्वांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागात विकासात्मक कामे कशी करता येतील याचा विचार करणे गरजेचे आहे.
- तेजस पाटील

ग्रामीण विकासात तरूणाईचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. कारण ग्रामीण भागात आज जे नवीन प्रयोग केले जातात, तेचं प्रयोग सोशल मीडियाच्या सर्वदूर पोहोचतात. इतर ठिकाणी सु्ध्दा विकासाच्या दृष्टीने तसेच प्रयोग राबवण्याची शक्यता असते. ग्रामीण भागात अनेक तरूणांनी नुकतेचं वृक्षारोपण केले. हा सुध्दा एक विकासाचा भाग आहे.
- महेश घोलप

ग्रामीण विकासामध्ये तरुणाईचा विकास हा जास्तीत जास्त प्रमाणात पाहिजे. कारण कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील ग्रामीण भागातील तरुणाईवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, ‘भारत’ हा एक कृषिप्रधान देश असून त्याचा विकास हा पूर्णपणे देशातील ग्रामीण भागातील तरुणांवर अवलंबून आहे. जर एखादा देश विकसित करायचा असेल तर त्या देशातील खेडे सुधारायला हवेत म्हणजे काय तर त्या खेड्यांचा विकास करायला पाहिजे आणि हे सर्व काही तेव्हाच होऊ शकते जेव्हा सर्वजन तरुण एकत्र येऊन देश विकासाची कामे करतील. “सबका साथ, सबका विकास” ह्या तत्वाचा वापर केला पाहिजे. ग्रामीण भागातील तरुण हे स्वतःसाठी जगताना समाजाची परतफेड करण्याच्या हेतूने ही काम करत असतात. ग्रामीण भागातील तरुण जगत असताना नेहमी नाविन्याचा शोध घेत असतो त्यामुळे ग्रामीण विकासामध्ये  तरुणाईचा सहभाग हा मोठया प्रमाणात असायला हवा. प्रत्येक देशाचा विकास हा त्या देशातील ग्रामीण भागाच्या विकासावरच अवलंबून असतो, त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण हा वेगवेगळे शोध लावून धाडसी निर्णय घेत असतात. आणि त्या निर्णयामधून ग्रामीण विकास मोठ्या प्रमाणावर होतो. आजचा तरुण हा उच्च शिक्षित, प्रचंड प्रमाणात ज्ञान असलेला इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग यशस्वी करणारा आहे त्यामुळे ग्रामीण विकासामध्ये तरुणाईचा वाटा हा सर्वाधिक असावा.
- शिल्पा नरवडे

ग्रामीण विकास म्हणजेच मुळात तरुणाचा विकास..ज्या गावातील तरुण विकसित असतील तेथील गावचा आपोआप विकास होईल. पण गावाने सुद्धा या तरुणाईला संधी दिली पाहिजे.
-संभाजी पाटील

कोणत्याही क्षेत्रामध्ये तरुणांचा सहभाग महत्वाचा असतो. कारण त्यांच्याकडे असणाऱ्या नव्या कल्पना, त्यांची जिद्द यांच्या बळावर विकास साधणे शक्य होते. 
बहुतांशी ग्रामीण भाग हा अजूनही अविकसीतच आहे. आणि म्हणूनच अशा अविकसित ग्रामीण भागाचा विकास करण्यात  महत्वाची भूमिका बजावू शकतात.
- नागेंद्र स्वामी

देशाची बहुसंख्य जनता ग्रामीण भागात राहते. त्यामुळे ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्यासाठी तरुणाईचा पुढाकार महत्वाचा आहे. समाजाच्या विकासासाठी लोकचळवळ गरजेची आहे. ही लोकचळवळ तरुणाई उभी करू शकते. त्यामुळे  ग्रामीण विकासात तरुणाईचा सहभाग आवश्यक आहे.
-स्वप्नील भालेराव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News