'राजकारणात वडिलोपार्जित सुरु असलेल्या परंपरेकडे तु्म्ही कसे पाहता?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • सामान्य कार्यकर्त्यांकडे नेत्रृत्व करण्याचे गुण असूनही घराणेशाहीमुळे पक्षामध्ये उच्च पदाची संधी मिळत नाही. त्यामुळे राजकारणाला घराणेशाहीचा सुरुंग लागला आहे.

मुंबई : 'सरकार' हा राज्याचा अविभाज्य भाग आहे, त्या शिवाय राज्याची संकल्पना पुर्ण होऊ शकत नाही. सरकार स्थापन करण्यासाठी राजकारणाचा मार्ग स्वीकारावा लागतो. पुर्वी पासून राजकारणात काही विशिष्ट घराण्यांचा दबदबा कायम आहे. आजोबा- पंजोबा, आई- वडील, मुलगा- मुलगी नातु- पंतू अशी कुटुंबातील घराणेशाहीची साखळी राजकारणात सक्रीय आहे. जनतेच नेत्रृत्व करण्यासाठी विशिष्ट गुण आवश्यक असतात. सामान्य कार्यकर्त्यांकडे नेत्रृत्व करण्याचे गुण असूनही घराणेशाहीमुळे पक्षामध्ये उच्च पदाची संधी मिळत नाही. त्यामुळे राजकारणाला घराणेशाहीचा सुरुंग लागला आहे. 'राजकारणात वडिलोपार्जित सुरु असलेल्या परंपरेकडे तु्म्ही कसे पाहता' या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपमध्ये आज मनोसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

राजकारणं वडीलांकडूण मुलाकडे येनारी व्यवस्था ही एक प्रकारची राजेशाही आहे. एकाच घरातील चार पाच आमदार होतात, म्हटल्यावर लोकशाही कुठे आहे. आणी घोटाळे पण तिथच जास्त होतं असतात. वडिलांनी निर्मान केले राजकीय करियर हे मुलागा पुढे तसंच चालवतो. दादा, 'तुम आगे बढो, हम तुमारे साथ है' एखादा पक्ष जर घराणेशाहीवर चालत आसेल तर तिथं पण राजेशाही निर्मान होते. पक्षातील इतर हुशार लोकांना प्रभावी पणे काम करता येतं नाही. आमच्या तिथं एकचा व्यक्तीला वर्षानुवर्ष पदावर बसवलं जाते. नंतर त्याचा मुलगा किंवा मुलगी येते. मग कस काय लोकशाही नांदेल. आजच्या शिकलेल्या युवकांनी लोकांचे झेंडे हातात घेणे थांबवले पाहीजे. आणि जनतेने सुध्दा नवनवीन व्यक्तींना संधी दिली पाहीजे.
-सागर वाघ

वडीलोपार्जित सुरू असलेल्या या परंपरेमुळे तेथे घराणेशाही सुरू होते. अशा घरात लहान असल्यापासून राजकारणाचे बाळकडू मिळते. मग त्या एकाच घरात आमदार, खासदार, नगरसेवक आपल्याला पाहिला मिळतात. त्यामुळे ते त्याचे वर्चस्व निर्माण करतात. पण ही परंपरा थांबली पाहिजे. कारण या परंपरेतून वाद-विवाद देखील होतात. अशा या घरणेशाहीत मग दोन घरात वैर असते ते वाढ जाते. मग तशीच वेळ आली की, मारामारी- खूण हे सगळ घडत असते. परंपरागत असल्यामुळे आदी जे पुढाऱ्याने केले तेच पुढची पिढी करणार म्हणून हे घराणेशाही राजकारण बंद झाले पाहिजे. नवीन तरूण पिढीला देखील संधी दिली पाहिजे. त्यांना ती संधी दिल्यावर त्यांनी त्या संधीचे सोने केले तर त्यांना देखील त्यांचा आनंद वाटेल. मी स्वत: पाहिले आहे की, त्यांच्या मुलाला राजकारणात जरा पण रस नसतो परंतु वडील राजकारणात आहेत मग त्यांने पण राजकारणच करावे हा त्यांच्या वडिलांचा हट्ट असतो. मग तेव्हा त्या मुलांना त्यांच्या मनाविरूध्द राजकारण प्रवेश करावा लागतो. मग राजकारणात रस नसल्यामुळे, तो डिप्रेशनमध्ये जातो. मग तेच वडिल राजकारणाच्या हट्टामुळे आपला मुलगा गमावून बसतात. राजकारणाचा वारसा सांभळताना आपलं सर्वस्व गमवतात. या सर्वामध्ये हाल होतात ते त्या पुढाऱ्याच्या पत्नीचे एकीकडे नवरा आणि दुसरीकडे मुलगा.

मला वाटते त्यांच्याकडे जे काही तरूण कार्येकर्ते असतात. त्यांच्यात देखील एखादा तरूण असा असतो की, त्याला राजकारणात खूप रस असतो पण त्याला ती संधी मिळत नाही. मग मला वाटत तेव्हा त्याच पुढाऱ्याने त्यांच्यातील कौशल्य आणि राजकारणातील रस पाहून त्याला ती संधी द्यावी. तसेच त्यांच पुढाऱ्याने त्याला राजकारणात मार्गदर्शन देखील करावे. म्हणजे त्यांच्या हातून एक चांगला तरूण राजकारणात प्रवेश देखील करू शकतो. 
- रसिका जाधव

राजकारण्यांची मुली राजकारणात येणे चुकीची नाही असे मला वाटते. कारण कुठल्याही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीला कष्ट घ्यावे लागतात. राजकारणामध्ये तसंच आहे एखाद्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला की ती व्यक्ती विजय होत असते असे नाही तर त्यासाठी राजकारणात जनमानसात जाव लागतं, राजकारण्यांची मुलं ते पण कष्ट घेतात. राजकीय जीवनात वावरत असताना सर्वसामान्य सोबत त्यांचा संपर्क त्यांना ठेवावा लागतो, त्यांच्या सुखदुःखात सामील व्हावं लागतं, त्यांची विविध कामे मार्गी लावावी लागतात, आणि त्यानंतर मग कुठेतरी राजकीय नेत्यांची मुले राजकारणात यशस्वी होतात. महाराष्ट्रात अशीही अनेक उदाहरणं आहेत राजकारण्यांची मुले राजकीय क्षेत्रात अयशस्वी झाले आहेत. कारण घरात परंपरागत राजकारण असल्यामुळे त्यांना जनमानसात वावरण्याची किंवा फिरण्याची आवश्यकता भासली नाही . 

या मुलांनी राजकारणामध्ये आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश केला, लोकांशी कायम संपर्क ठेवला, निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर गेले आणि ते विजयी झाले यात मला काही गैर वाटत नाही. कारण राजकारण हा शेवटी पैशांचा खेळ आहे ज्यांच्याकडे पैसे असतात ते राजकारण मध्ये प्रवेश करतात, सर्वसामान्य युवकाकडे पैसा नसल्याकारणाने युवक त्याजागी क्षितिजापर्यंत जाऊ शकत नाहीत यामुळे राजकारणात पैसा ही सर्वात मोठी गोष्ट आहे असे माझे वैयक्तिक मत आहे कारण ओळख बनवायला सुद्धा आपल्याला पैसाच लागतो आणि राजकारणात काम करायला सुद्धा पैसाच लागतो यामुळे राजकारण्यांची मुले राजकारणात असणं अपेक्षित आहे परंतु ते संघर्षातून राजकारण्यांची मुले यशस्वी होतात हे सुद्धा बघणे गरजेचे आहे त्यांनासुद्धा टोकाचा विरोध आणि टोकाचा संघर्ष करावा लागतो तेव्हा ते राजकारणात यशस्वी होतात असे माझे वैयक्तिक मत आहे.
- गणेश स्वामी

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी, वकिलाचा मुलगा वकील राजकारण्यांचा मुलगा राजकारणी अशी प्रथाच आहे. मुख्य म्हणजे राजकारण करण्यामध्ये सर्वसामान्य जनता जास्त लक्ष घालत नाही. कारण त्यांच्या मनात फक्त एकच विचार असतो तो म्हणजे राजकारण करणे आपले काम नाही. त्यामुळे राजकीय वारसा असलेली मुले त्यात त्यांना बाळकडू नावच शिक्षण लहानपणापासूनच घेतलेलं असते त्यामुळे त्यांना तो वारसा चालवणं अजूनच सोपं जातं. आणि आपली सर्वसामान्य माणसांची मुले प्रत्येक गोष्टीत पुढे असून सुद्धा ते राजकारणामध्ये माघेच राहतात.त्यामुळे राजकारणी वारसा असलेले तसेच इतर नेत्यांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना मोकळ्यामनाने संधी दिली पाहिजे,असे मला वाटते.
- शिल्पा नरवडे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News