उच्च शिक्षित तरुण शेतीकडे कसे पाहतात?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  •  निसर्गाने झोडपलं आणि सरकराने लाथाडल तर कुणाकडे दाद मागायची? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे

मुंबई: ओळा दुष्काळ, सुका दुष्काळ, पूर, चक्रीवादळे या नैसर्गिक कारणामुळे शेतीचे आतोनाथ नुकसान होत आहे. सरकार यावर तुटपूंजी मदत जाहीर करतो त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कधीही भरुन निघत नाही. या सर्व चक्रव्युवातून मार्ग काढून शेतकरी उत्पादन घेतो  मात्र शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे निसर्गाने झोडपलं आणि सरकराने लाथाडल तर कुणाकडे दाद मागायची? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. शेतकऱ्याचा कोणीही वाली नाही अशी परिस्थिती आहे. शेतामध्ये टाकलेला खर्च जाऊन शिल्लक काहीच राहत नाही, अशा परिस्थिती काही शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत तर काहींनी नोकरी, व्यवसायाचा मार्ग स्वीकारला आहे. उच्च शिक्षित तरुण शेतीकडे कसे पाहतात? या विषयावर यिनबझच्या विविध व्हॅट्सअॅप ग्रुपवर चर्चा करण्यात आली. त्यातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत.

शेती हा एक प्रकारचा जुगार आहे आणि तो जुगार मी खेळतो याचा मला अतिशय आनंद आहे
- तेजेस श्रीराम
 
'शेती करणा धन का नाश' अशी म्हण महाराष्ट्राच्या मध्यमवर्गीय कुटुंबात रुढ झाली आहे मात्र त्याला अपवाद ठरत अनेक शेतकरी उच्चशिक्षित तरुण शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता. हे उदाहरण द्यायला म्हटलं तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा प्रण गावातील युवा शेतकरी हितेंद्र गुलाब सिंग गिरासे. मध्यमवर्गीय कुटुंबातील उच्चशिक्षित असणारा हितेंद्र गिरासे यांनी 2017 साली देश बंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशन यांच्या समन्वयक साधातुन जय भगवती दूध उत्पादक सोसायटीची स्थापना केली. स्वतः प्रगती करत असताना  काही शेतीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत होते त्याचा सकारात्मक दृष्टीकोन केला. अनेक युवकांना शेती या विषयाकडे आणले. महात्मा ज्योतिराव फुले कृषी विद्यापीठ यांच्यात समन्वयक साधनातून केव्हीकेच्या माध्यमातून त्यांनी गावात विविध शेती विषयक उपक्रम राबविणे सुरु केले. सेंद्रिय शेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि म्हणूनच गावातच नाही तर अवघ्या पंचक्रोशीत त्यांची सद्यस्थितीला ख्याती आहे. शेती विषयावर ते नेहमी सहलींचे आयोजन देखील करतात. न परवडणारी शेती जोडधंदा यासंदर्भात असणारा नकारात्मक दृष्टिकोन यांनी मात्र बदलून दाखविला.  उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार तर कृषी विज्ञान केंद्राचा अनेक पुरस्कारांनी युवा शेतकरी म्हणून हितेंद्र गिरासे यांचा गौरव करण्यात आला. मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीला अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक चळवळीत काम सुरू आहे. सध्याच्या युवक वर्गाने तर त्यांच्याकडून प्रेरणा घेतली तर नक्कीच शेती विषयक असणारे नकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक स्वरूपात बदलतील
-अमरजीतसिंग राजपूत

उच्चशिक्षित तरुणांना शेती जास्त आवड नसते. बऱ्याच तरुणांना शेती करण्यास लाज वाटते. आपल्याकडील शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर खूप कमी करतो. त्याचे परिणाम पाहिजे तसें उत्पन्न होत नाही. जर उच्चशिक्षित तरुणांनी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली तर उत्पन्न भरघोस होईल.
- कृष्णा गाडेकर

पारंपारीक शेती न करता आधुनिक शेती कडे वळायला पाहीजे
- हनुमान येडमे

आधुनिक शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. गरीब शेतकरी हे करु शकत नाही. सावकाराची देणी आणि कर्णी फेरण्यात पिकाचा पैसा खर्च होतो. आधुनिक तंत्रज्ञान विकत घेणयासाठी पैसा शिल्लक राहत नाही अशा परिस्थितीत आधुनिक शेती कशी करावी असा प्रश्न उपस्थित होतो.   
- दत्ता जाधव

शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. आजची बहुतेक शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते कारण आधुनिक पद्धतीने शेती करन्यासाठी त्यांला वित्त पुरवठा पुरेशा प्रमाणात मिळत नाही. जे नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही आणि त्यांचे त्यांना प्रशिक्षणही मिळत नाही. आपल्याकडे soil health card कोणीही वापर नाही करत त्यामुळे अवजवी खत टाकले जाते. शेतात त्यातून त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते. ठिबक सिंचन, सेंद्रिय खते, निंबोळी अर्क अशा अनेक पध्दतीचा अवलंब करावा. प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा करायला हवं. पिकलेला माल येईल त्या भावात न विकता स्वतः market मध्ये जाऊन चांगल्या भावाला माल विकावा. शेतकऱ्यांनी सरकारच्या नवनवीन योजना जाणून घ्याव्यात आणि त्याचा लाभ घ्यावा.
- प्रतिक भालेराव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News